Timepass 3 Movie teaser released, manoranjan news, Latest Marathi movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

दगडू-प्राजूच्या प्रेमात नवीन फुलपाखराची एंट्री? Timepass 3 चा धडाकेबाज टीझर रिलीज

रवी जाधव दिग्दर्शित ‘टाईमपास 3’ (Timepass 3 Teaser) या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटाला टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

श्रेयस सावंत

श्रेयस सावंत

मुंबई: रवी जाधव दिग्दर्शित ‘टाईमपास 3’ (Timepass 3 Teaser) या बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित चित्रपटाला टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘टाईमपास’च्या सीरिजमधील या तिसऱ्या भागात अभिनेत्री हृता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि प्रथमेश परब (Prathamesh Parab) यांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात बहुतेक अभिनेत्री हृताचा कधीही न पाहिलेला अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे आणि त्याचीच झलक या टीझरमध्ये दाखवण्यात आली आहे. ‘आई बाबा आणि साईबाबा शप्पथ, आणतोय तीच मजा, तोच टाईमपास एका वेगळ्या अंदाजात. पाहा दगडू आणि पालवीच्या गोष्टीची झलक,’ असं कॅप्शन देऊन हृताने सोशल मीडियावर चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. (Timepass 3 Movie teaser released)

या टीझरची सुरुवात ‘लहानपणी टाईमपास म्हणून झालेल्या लव्हपासून लग्नाच्या लोच्यापर्यंतची स्टोरी सगळ्यांनी पाहिली. पण त्या प्रवासात अजून एक गोष्ट होती जी...,’ अशी होते. सुरुवातीला चित्रपटाच्या पहिल्या भागातील दगडू आणि प्राजक्ताची झलक आणि मला वेड लागले हे गाणं दाखवल्यानंतर पालवीची धमाकेदार एंट्री होते. तिचे काही ऍक्शन दृश्ये दाखवले जातात आणि यावेळी ती म्हणते “आपन पालवी दिनकर पाटील, अशी पालवी जी फुटत नाय, फोडते, “आपल्या दोस्ताला जो नडेल, त्याचा आपन मार्बल फोडेल” अश्या डायलॉगने ऋताचा डॅशिंग अवतार दिसून येतो. तर दगडूचा डायलॉग “मनाचा डोअर ओपन ठेवला की ज्ञानाचा लाईट कधी कुठून कसा येईल काही सांगता येत नाही”, असा दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात एकापेक्षा एक भन्नाट डायलॉग या टीझरमध्ये दाखवण्यात आले आहेत. त्यामुळे चित्रपटात आणखी काय पाहायला मिळणार यासाठी प्रेक्षक फार उत्सुक आहे.

तसेच प्रथमेश परबचा दगडू आणि वैभव मांगले हे सुद्धा या टिझरमध्ये दिसत आहेत. आता ही नेमकी गोष्ट आपल्याला काय दाखवणार आहे? पालवी नेमकी कोण आहे? चित्रपटात या चित्रपट प्राजू आहे की नाही? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. या सर्वांची उत्तरे 29 जुलैला आपल्याला मिळणार आहेत. तूर्तास तिसऱ्या भागाच्या या टिझरने उत्सुकता वाढवली आहे...

तर, ‘टाईमपास’ हा चित्रपट 2014 मध्ये प्रदर्शित झाला होता. अभिनेता प्रथमेश परब आणि अभिनेत्री केतकी माटेगावकरने यामध्ये मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्यानंतर 2015 मधील ‘टाईमपास 2’मध्ये प्रियदर्शन जाधव आणि प्रिया बापटने मुख्य भूमिका साकारली होती. या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन रवी जाधवने केले होते. आता ‘टाईमपास 3’मध्ये हृता आणि प्रथमेशची नवी जोडी पहायला मिळत आहे. ऋताच्या या नवीन अंदाजामुळे सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. अभिनेत्री ऋता दुर्गुळेने फुलपाखरू मालिकेत काम केले होते. त्यावेळी तिला क्रश हा टॅग देण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: धक्कादायक! ओळखीनं केला घात; बॉक्समध्ये आढळला बेपत्ता होमगार्ड महिलेचा मृतदेह

Bull Beauty Parlour: नंदुरबारमध्ये बैलांचं ब्युटी पार्लर

Raj Thackeray Meeting Devendra Fadnavis: बेस्ट पराभवानंतर अवघ्या २४ तासात राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला चर्चांना उधाण

Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांचं संघ दक्ष, RSS च्या बैठकीला सुनेत्रा पवारांची हजेरी? कंगनाच्या घरी काय घडलं?

IT Job Crisis: आयटी क्षेत्रात नोकर कपात; 80 हजार कर्मचाऱ्यांना दिला नारळ

SCROLL FOR NEXT