Timepass 3 Marathi Movie
Timepass 3 Marathi Movie Saam TV
मनोरंजन बातम्या

Timepass 3: 'टाइमपास ३' आता ओटीटीवर; हृता दुर्गुळे म्हणाली, शूटिंगचा पहिलाच दिवस...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: ZEE5 भारतातील सर्वात मोठा बहुभाषिक आशय देणारा ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. ZEE5 आपल्या प्रेक्षकांसाठी पांडू, झोंबिवली, धर्मवीर अशा यशस्वी मराठी सिनेमांच्या यादीत टाइमपास ३ चा समावेश करण्यासाठी सज्ज झाला आहे. रवी जाधव दिग्दर्शित या चित्रपाटात हृता दुर्गुळे आणि प्रथमेश परब यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचे १६ सप्टेंबर रोजी ZEE5 वर प्रीमियम होणार आहे.

या यशस्वी सीरिजमधल्या तिसऱ्या सिनेमात प्रथमेश परब आणि हृता दुर्गुळे मुख्य भूमिकेत दिसत आहेत. ३६ टक्के मिळवून बारावीची परीक्षा पास झाल्यानंतर दगडू कॉलेजविश्वात पाऊल टाकतो आणि मग पुढे काय होते हे या सिनेमा पाहिल्यावर कळेल. गुंड म्हणून आपला भूतकाळ मागे टाकत आपल्या आयुष्याची तो नवी सुरुवात करतो. पण त्याच्या अवतीभवती असलेल्या लोकांनीच त्याचे आयुष्यपणाला लावले. आपण कधीच बदलणार नाही असे त्याला वाटायला लागते, मात्र तरीही पुढे जात राहाण्याचे बळ त्याला मिळते, कारण तो एका गँगस्टरच्या मुलीच्या अर्थात पालवीच्या प्रेमात पडतो. दगडूच्या सुसंस्कृत वागण्याने पालवी प्रभावित होते, मात्र सगळ्याच चांगल्या गोष्टी कधी ना कधी संपतात या न्यायाने दगडूचा हा वेगळा अवतारही संपतो. त्यामुळे दगडू- पालवीच्या नात्यावर काय परिणाम होतो हे या सिनेमा पाहिल्यावरच कळेल.

सिनेमाविषयी हृता दुर्गुळे म्हणते, ‘या सिनेमात काम करताना माझ्यासमोर एकच आव्हान होते ते म्हणजे भाषेचे. पालवी ज्या पद्धतीने तसेच लहेजामध्ये बोलते ते माझ्यासाठी सोपे नव्हते. शूटिंगचा पहिलाच दिवस माझ्यासाठी खूप अविस्मरणीय होता, विशेषतः पालवी म्हणून मी जेव्हा तयार झाले तो क्षण मी कधीही विसरु शकत नाही. तो सगळाच अनुभव माझ्यासाठी मजेदार आणि वेगळा होता.’

कोटींची कमाई केलेल्या तसेच प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या टाइमपास 3 मध्ये संजय नार्वेकर, भाऊ कदम, वैभव मांगले प्रमुख भूमिकेत आहेत. पूर्णपणे कौटुंबिक मनोरंजनाचा अनुभव देणाऱ्या या सिनेमाला विनोद आणि रोमान्सचाही तडका देण्यात आला आहे. १६ सप्टेंबरपासून फक्त ZEE5 वर चित्रपट पाहू शकता. चित्रपटाला IMDB वर ७.३ इतका रेटिंग प्राप्त झाला आहे.

Edited By: Chetan Bodke

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shantigiri Maharaj: नाशिकमध्ये शिंदे गटाकडून शांतीगिरी महाराजांना उमेदवारी?

KKR vs DC: कोलकताच्या भेदक गोलंदाजीसमोर दिल्लीची बत्ती गुल; KKRसमोर १५४ धावांचे आव्हान

Maharashtra Politics: राज ठाकरेंची तोफ कोकणात धडाडणार, नारायण राणेंसाठी घेणार सभा

Amit Shah यांच्या हेलिकॉप्टरचं नियंत्रण सुटलं, मोठा अनर्थ टळला!

Mumbai News: मुंबईच्या रस्त्यावर रात्री थरार; चिकन तंदुरीवरून वाद उफाळला, तरूणाला रस्त्याच्या मधोमध संपवलं

SCROLL FOR NEXT