Salman Khan - Kriti Sanon At Bigg Boss 17 Saam TV
मनोरंजन बातम्या

Salman Khan-Kriti Sanon: 'माझं डोकं फिरवू नको', क्रिती सेननवर भडकला सलमान खान

Ganapath Cast: टायगर आणि क्रिती चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिजी आहेत.

Pooja Dange

Salman Khan-Kriti Sanon at Bigg Boss 17:

बॉलिवूड अ‍ॅक्टर टायगर श्रोफ आणि क्रिती सेनन यांचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'गणपत: अ हिरो इज बॉर्न' २० ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. टायगरसह क्रितीने देखील या चित्रपटामध्ये जबदस्त अ‍ॅक्शन करताना दिसत आहे. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर देखील टायगर आणि क्रिती चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिजी आहेत. चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी दोन्हीही कलाकार 'बिग बॉस १७'च्या सेटवर उपस्थित होते. तर सेटवर क्रिती आणि सलमानमध्ये दिमाग आणि दमवरून वाद सुरु झाला. टायगर श्रॉफला या दोघांच्या वादामध्ये मध्यस्थी करावी लागली.

कलर्स टीव्हीने त्यांच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये क्रिती सेनन आणि टायगर श्रॉफ, सलमानला शोचा डेमो द्यायला सांगतात. त्यांनतर सलमान खान, क्रितीला चहा बनविण्याचा अभिनय करायला सांगतो.

क्रिती चहा बनविण्याचा अभिनय करत असते, तेव्ह सलमान खान तिला काहीतरी बोलतो. त्यावर क्रिती सलमानला म्हणते, 'दिसत नाही का चहा बनवत आहे ते.' त्यावर सलमान खान म्हणतो, 'हा काय ऍटिट्यूड आहे.'

क्रिती: माझं डोकं नको फिरवू.

सलमान: डोक्याविषयी (दिमाग) नको बोलू, माझ्याकडे नाहीये.

क्रिती: माझ्या भावना दुखावल्या जात आहेत.

सलमान: मला वाटते इथे माझी नोकरी धोक्यात आहे.

टायगर: तुम्ही तुमचे भांडण बंद करा, लहान मुलं आहेत का?

टायगरचं बोलणं ऐकल्यानंतर सलमान आणि क्रिती जोरजोरात हसू लागतात. (Latest Entertainment News)

'बिग बॉस १७' सुरू होऊन आता आठवडा होईल. 'बिग बॉस' हा वादग्रस्त शो आहे. यावेळी 'बिग बॉसच्या घरामध्ये दोन कपल आहेत. अंकिता लोखंडे-विकी जैन आणि नील भट-ऐश्वर्या शर्मा हे सेलिब्रिटी सहभागी झाले आहेत. तसेच प्रियांका चोप्राची बहीण मनारा चोप्रा देखील 'बिग बॉस'मध्ये सहभागी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT