Tiger Shroff Firing SAAM TV
मनोरंजन बातम्या

Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात नवं वळण! सलमान खानसह ४ बड्या अभिनेत्यांच्या घरांची रेकी, मुंबईतील 'या' व्यक्तीने केली मदत

Bollywood Stars Home Recced : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात अमिताभ बच्चन, आमिर खान, अक्षय कुमार आणि सलमान खान यांच्या घरांची रेकी केल्याची माहिती समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट

बड्या स्टार्सच्या घरांची रेकी

अभिनेत्यांची घरे पाहण्याच्या बहाण्याने पत्ते मिळवले

साक्षी यादव, साम टीव्ही प्रतिनिधी

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात तपासादरम्यान महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपींनी टायगर श्रॉफला टार्गेट करण्यापूर्वी अमिताभ बच्चन, आमिर खान, अक्षय कुमार आणि सलमान खान यांसारख्या बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांच्या घरांची रेकी केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली. कमी सुरक्षा असलेल्या सेलिब्रिटींना शूटर्सना टार्गेट करायचे होते.

रिक्षाचालकांची मदत

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी मुंबईतील वांद्रे परिसरात फिरण्यासाठी रिक्षाचालकांची मदत घेतली. अभिनेत्यांची घरे पाहायची असून त्यांचे फोटो काढायचे आहेत, असे सांगून त्यांनी रिक्षाचालकांकडून सेलिब्रिटींच्या घरांचे पत्ते मिळवले. यानंतर आरोपींनी अमिताभ बच्चन, आमिर खान, अक्षय कुमार आणि सलमान खान यांच्या घरांच्या परिसराची पाहणी केली. या ठिकाणी असलेली कडेकोट सुरक्षा बंदोबस्त सहज पार करणे शक्य नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी यासंदर्भातील माहिती अनिल पंडितला दिली. रेकीदरम्यान काढलेले काही फोटो आणि व्हिडिओही अनिल पंडितला पाठवण्यात आले.

टायगर श्रॉफ निशाण्यावर

बॉलिवूडमधील मोठ्या अभिनेत्यांच्या घराबाहेर कडेकोट सुरक्षा असल्याने आरोपींनी आपले टार्गेट बदलले. त्यानंतर आरोपींनी टायगर श्रॉफच्या हालचालींवर लक्ष केंद्रित केल्याची माहिती समोर आली आहे.टायगर श्रॉफ दर शनिवारी आणि रविवारी फुटबॉल खेळण्यासाठी एका मैदानावर जात असल्याची माहिती आरोपींना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे त्यांनी जुहू परिसरातील मैदानाची पाहणी केली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ११ ऑक्टोबर रोजी जुहू येथील मैदानावर गेले होते. मात्र, त्या दिवशी टायगर श्रॉफ तिथे आला नसल्याने ते परतले. त्यानंतर १८ ऑक्टोबर रोजी आरोपी पुन्हा त्या ठिकाणी पोहोचले. यावेळी त्यांच्याकडे शस्त्रे होती. दरम्यान, याच कालावधीत हरियाणातील आणखी काही व्यक्ती मुंबईत येऊन रेकी करून पुन्हा परत गेल्याची माहितीही तपासातून समोर आल्याचे सांगितले जात आहे.

गोळीबारासाठी देशी- विदेशी पिस्तुलांचा वापर

या गोळीबारासाठी एक विदेशी आणि एक देशी पिस्तूल वापरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबारानंतर मुंबईतून बाहेर पडताना आरोपींनी दोन्ही पिस्तुले अज्ञात ठिकाणी फेकून दिली. त्यामुळे आता ही शस्त्रे शोधून काढण्याचे मोठे आव्हान मुंबई पोलिसांसमोर आहे. शस्त्रे कुठे फेकण्यात आली, ती पुन्हा मिळवता येतील का आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bad smell in car: कोणत्या कारणांमुळे कारमध्ये दुर्गंधी येऊ लागते?

Political News : राजकारणात खळबळ! मुख्यमंत्र्यांना ३ तास दिल्ली एअरपोर्टवर थांबवलं; ५० हजारांचा दंड घेतल्याचा आरोप

Marigold Plant : दिवाळीपर्यंत झेंडूच्या रोपाला येतील भरपूर फुलं; माळ्याची ही मोफत ट्रिक वापरा

Weak Heart Symptoms: ही १० लक्षणे सांगतील तुमचे हृदय कमजोर झाले आहे: चुकूनही करू नका दुर्लक्ष!

Sleep Mistakes : गाढ झोप झाली तरी सकाळी उठल्यावर डोकं का भणभणतंय? 'या' ५ गंभीर चुका ठरू शकतात कारणीभूत

SCROLL FOR NEXT