Tiger Shroff firing case latest updates from Mumbai Police saam tv
मनोरंजन बातम्या

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

Tiger Shroff Firing: टायगर श्रॉफच्या कारवरील गोळीबारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांना तपासाचे आदेश दिलेत. तपासासाठी १५ पथके तयार करण्यात आली असून एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलीय.

Bharat Jadhav

  • मुंबईतील जुहू परिसरात अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार

  • मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई पोलीस आयुक्तांशी संपर्क साधून तपासाचे निर्देश दिले.

  • प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांनी १५ पथके तयार

मुंबईच्या जुहू परिसरात बॉलिवूडचा अभिनेता लेक टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या हल्ल्याची जबाबदारी कुख्यात बिश्नोई टोळीनं घेतली आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना फोन लावत त्वरीत तपास सुरू करण्याचे आदेश दिलेत. यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत घटनेच्या तपासासाठी 15 पथके नेमली. ही पथके आता हल्लोखोरांचा शोध घेणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार एका संशियताला ताब्यात देखील घेण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी कोणतीच अधिकृत माहिती दिली नाहीये.

रविवारी सायंकाळी सव्वा सात वाजण्याच्या सुमारास पुष्पा नर्सिंग पार्क परिसरात ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार टायगर श्रॉफ मुंबईच्या जुहू भागात फुटबॉल खेळण्यासाठी गेला होता. या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत. हल्ला होण्याआधी टायगर श्रॉफची कार पार्कच्या बाहेर पडत होती त्यावेळी चाहत्यांचा मोठा गराडा होता.

त्याचवेळी दुचाकीवरून तिघांनी टायगरवर गोळीबार केला. व्हायरल झालेल्या व्हिडिओत दोन हल्लेखोर दिसत आहेत, यातील एकानं तीन ते चार गोळ्या झाडल्या. कारच्या समोर येत हल्लेखोरांनी गोळीबार केला. कारपासून ते फक्त एक फुटाच्या अंतरावर होते.

गोळीबाराचा थेट LIVE Video समोर

टायगर श्रॉफ जुहू परिसरातील एका मैदानात फुटबॉल खेळून आपल्या कारने गेटमधून बाहेर पडत होता. त्याच वेळी तीन जण दुचाकीवरून आले. त्यापैकी दोघांनी कारच्या अगदी समोरून थेट गोळीबार सुरू केला. हल्लेखोरांनी जवळपास ६ ते ७ राऊंड फायर केले. या हल्ल्यात एका हल्लेखोराची रिवॉल्वर ऐनवेळी अडकली. ज्यामुळे टायगर श्रॉफचा जीव वाचला. गोळी मारण्याचा त्याने दोन वेळा प्रयत्न केला. परंतु रिव्हॉल्वर चालत नसल्याचे पाहून तो दुचाकीवर बसला. तिघेही हल्लेखोर काही क्षणात तिथून पसार झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

पुण्यात खड्ड्यात पडून एका व्यक्तीचा मृत्यू, मनपाचा निष्काळजीपणा बेतला जीवावर? 8 महिन्यात खड्ड्यांमुळे 198 जणांचा बळी

'टेस्ला'च्या फ्लाईँग कारवर मीम्स व्हायरल, मस्क यांच्या निर्मितीला भारतीयांची मिश्किल दाद

Punjab Accident: भरधाव कारनं मनरेगा मजुरांना चिरडलं; 8 जणांचा जागीच मृत्यू

बाळूमामाची शपथ मोडल्यास ब्रेन स्ट्रोक, गोकुळ'च्या निवडणुकीत अंधश्रद्धेचा बाजार

SCROLL FOR NEXT