Tiger Shroff Firing SAAM TV
मनोरंजन बातम्या

Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा! आरोपींना मिळत होते तपासाचे धागेदोरे, कोण पुरवत होतं अपडेट्स?

Tiger Shroff Case Update : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. आरोपींना टीव्ही बातम्या आणि सोशल मीडियावरून तपासाची माहिती मिळत असल्याचा पोलीसांना संशय आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात आरोपींना तपासाचे धागेदोरे मिळत होते.

मुंबई पोलीस आरोपींना तपासाची माहिती पुरवणारी व्यक्तीचा शोध घेत आहेत.

आरोपी रेहान सतत फोनवर असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले.

साम टीव्ही प्रतिनिधी - साक्षी यादव

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर मुंबईत गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर पोलीस या प्रकरणाचा तपास घेत आहे. या तपासात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. अशात आता या प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे. पोलिसांच्या तपासातील घडामोडींची माहिती आरोपींपर्यंत टीव्ही चॅनेलवरील बातम्या आणि सोशल मीडियावरील व्हिडिओंच्या माध्यमातून पोहोचत होती, असे पोलीस तपासात आढळून आले. बातम्या पाहून आरोपींना सतर्क केले जात असल्याचा पोलिसांना संशय आहे.

टीव्ही बातम्या- सोशल मीडियावरून आरोपी सतर्क

पोलिसांच्या तपासासंदर्भातील बातम्या प्रसारित झाल्यानंतर आरोपींना त्याची माहिती मिळत होती, असा संशय व्यक्त केला जात आहे. तपासातील घडामोडी समजताच आरोपींना सावध केले जात होते का, याचा शोध पोलीस घेत आहेत. आरोपींना ही माहिती नेमकी कोण पुरवत होते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

इंटरनेट कॉलिंगचा वापर?

या प्रकरणातील आरोपी रेहान सतत फोनवर असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. इंटरनेट कॉलिंगच्या माध्यमातून आरोपींना पोलिसांच्या तपासाचे अपडेट्स दिले जात होते का, याची चौकशी सुरू आहे. इंटरनेट कॉलिंगमुळे आरोपींच्या संपर्कांचा मागोवा घेणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरल्याचे सांगितले जात आहे.

पोलिसांना चकवा देण्यासाठी बाइक, ट्रेन, कॅबचा वापर

अंधेरी परिसरात बाइक सापडल्याची तसेच आरोपी ट्रेनने प्रवास करत असल्याची माहिती मेसेजद्वारे त्यांच्यापर्यंत पोहोचवली जात होती, असा दावा केला जात आहे. त्यामुळे आरोपींना तपासातील माहिती देणारी व्यक्ती कोण, याचा शोध पोलीस घेत आहेत.पोलिसांपासून बचाव करण्यासाठी आरोपींनी बाइक, ट्रेन आणि कॅबचा वापर केल्याचे तपासात समोर आले आहे. वेगवेगळ्या वाहतुकीच्या साधनांचा वापर करून ते पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न करत होते, असा संशय आहे.

दरम्यान, मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीच्या आधारे कोटा पोलिसांनी सुरतहून जयपूरला जाणाऱ्या ट्रेनमध्ये आरोपींना पकडले. आता आरोपींना तपासाची माहिती देणारी व्यक्ती कोण होती आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास मुंबई पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CBI Action: ईडीच्या २ बड्या अधिकाऱ्यांना अटक, लाच घेताना सीबीआयने रंगेहाथ पकडलं

Bad Cholesterol: हार्ट अटॅकचा धोका कमी करतील हे 5 ड्रिंक्स; नसांमध्ये जमा झालेली चरबी काही दिवसांत वितळेल

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये पाणी मिळत नसल्याने तरुण संतप्त, अहमदपूर नगराध्यक्ष कार्यालयात तोडफोड

Diwali Karanji Recipe : खुसखुशीत करंजी बनवण्याची सोपी रेसिपी, दिवाळी फराळाची वाढेल रंगत

Mumbai : मुंबईत ATS ची मोठी कारवाई! दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT