Salman Khan And Imran Hashmi Kissing Viral Video
Salman Khan And Imran Hashmi Kissing Viral Video Twitter
मनोरंजन बातम्या

Salman Khan And Imran Hashmi Video: सलमान खानने स्टेजवरच इमरान हाश्मीला केलं किस, कतरिना कैफ लाजली

Chetan Bodke

Salman Khan And Imran Hashmi Kissing Viral Video

सलमान- कतरिनाच्या ‘टायगर ३’ची प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून थिएटर्समध्ये जादू पाहायला मिळतेय. दिवाळीच्या शुभमुहूर्तावर अर्थात १२ नोव्हेंबरला हा चित्रपट जगभरामध्ये रिलीज झाला आहे. चित्रपटाने जेमतेम सहा दिवसातच अफलातून कामगिरी करत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या चित्रपटाच्या यादीमध्ये सामील झाला आहे. जगभरामध्ये चित्रपटाने ३०० कोटींच्या आसपास व्यवसाय केला असून चित्रपटाचे सक्सेस सेलिब्रेट करण्यासाठी चित्रपटातले सर्व कलाकार उपस्थित होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चित्रपटाच्या सक्सेस पार्टीमध्ये, सलमान खान, कतरिना कैफ आणि इमरान हाश्मीने उपस्थिती दर्शवली होती. इव्हेंटमध्ये सलमानने निळ्या रंगाचा टी-शर्ट आणि डेनिम जीन्स घालून आला होता. तर, पिवळ्या रंगाच्या वन पीसमध्ये कतरिनाने हजेरी लावली होती. तर सोबतच इमरानने काळ्या रंगाचा टी-शर्ट व ग्रे पँट घालून आला. यावेळी इव्हेंटमध्ये, सलमान खानने इमरान हाश्मीसोबत असं काही केलं की, कतरिना पाहतच राहिली...

सध्या सोशल मीडियावर सक्सेस पार्टीमधील व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सलमान म्हणतोय, “कतरिना चित्रपटामध्ये असल्यामुळे झोया आणि टायगरचा तुम्हाला रोमान्स पाहायला मिळणार आहे. आणि जर इमरान हाश्मीने आतिशची भूमिका साकारली नसती तर हे घडलंच असतं.” हे वाक्य बोलून सलमानने इमरान खानला पकडून त्याच्या किसिंग स्टाईलची नक्कल केली. त्याचं हे कृत्य पाहून कतरिना कैफसह सर्व उपस्थित जोरजोरात हसायला लागले.

व्हिडीओमध्ये सलमान म्हणाला, “मला ही सवय (किसिंग सीन देण्याची) कधीच नव्हती, पण मला असं वाटतंय, इमरान हळूहळू ती सवय सोडतोय.” सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. चित्रपटाने सहा दिवसात एकट्या भारतात २०० कोटींचा टप्पा गाठला असून जगभरामध्ये ३०० कोटींच्या आसपास कमाई केली आहे. सलमान खानने चित्रपटामध्ये, रॉ एजंट टायगरचे पात्र, तर कतरिनाने आयएसआय एजंट झोयाचे पात्र साकारले. तर इमरान हाश्मी एका खतरनाक व्हिलनच्या भूमिकेचे पात्र साकारणार आहे. (Bollywood Film)

मनिष शर्मा दिग्दर्शित ‘टायगर ३’ १० नोव्हेंबर २०२३ रोजी अर्थात दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे. ‘एक था टायगर’चा हा ट्रायोलॉजी (तिसरा भाग) आहे. पहिला भाग ‘एक था टायगर’, दुसरा भाग ‘टायगर झिंदा हैं’ हा होता. हे दोन्ही भाग सुपरहिट ठरले होते. आता तिसरा भाग म्हणजे ‘टायगर ३’ रिलीज होणार असून हा भाग देखील सुपरहिट ठरेल अशी अपेक्षा केली जात आहे. (Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Live News Updates : विधानपरिषद निडणुकीसंदर्भात वर्षावर खलबते, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्याची बैठक

Special Report: Paper Plate: KEM रुग्णालयात पेपर प्लेट बनविण्यासाठी रुग्णांचे रिपोर्ट कार्ड? नेमकं प्रकरण काय?

IND VS ZIM : कर्णधार शुभमन गिलने लाजिरवाण्या पराभवासाठी कुणाला जबाबदार ठरवलं? पाहा व्हिडिओ

Special Report: Manoj Jarange: जरांगेंच्या आरोपांनी राज्यात खळबळ!

Special Report: Ravindra Waikar: वायकरांना क्लीन चीट, क्लीन चीटवरून राऊतांचा सरकारवर निशाणा!

SCROLL FOR NEXT