Tiger 3 Release Twitter
मनोरंजन बातम्या

Tiger 3 चित्रपट रिलीज झाल्यानंतर चाहत्यांचा जल्लोष; सलमान खानच्या चाहत्यांनी चित्रपटगृहाबाहेर वाजवले ढोल-नगाडे

Tiger 3 Release: चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांनी मोठा जल्लोष करत सलमान खानचं अभिनंदन केलं.

Bharat Jadhav

Salman Khan Tiger 3 Movie Release :

सलमान खानचा 'टायगर ३' आज चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून याला मोठा प्रतिसाद मिळत आहे. भाईजानच्या चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांनी चित्रपटगृहात मोठी गर्दी केली. कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी सारख्या स्टार्स असलेल्या 'टायगर ३' च्या पहिल्या दिवशी ४० कोटी रुपयांची कमाई करेल, असा अंदाज आहे. (Latest News)

'टायगर ३'चा पहिला शो सकाळी ६ वाजता सुरू झाला. सलमान खानचा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये खूप क्रेझ होती. चाहत्यांनी सकाळपासूनच चित्रपटगृहांबाहेर लोकांची गर्दी केली होती. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांनी मोठा जल्लोष करत सलमान खानचं अभिनंदन केलं. या चित्रपटाला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटगृहाबाहेर सलमानच्या चाहत्यांनी ढोल-ताशांच्या तालावर नाचत जल्लोष केला. 'भाईजान'च्या डायहार्ट चाहत्यांचा जल्लोष सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यश राजचा स्पाय युनिव्हर्सचा चित्रपट 'टायगर ३' मध्ये सलमान आणि कतरिना यांचे रंजक अॅक्शन सीन आहेत. अविनाश सिंग राठौर (सलमान खान) आणि झोया (कतरिना कैफ) यांच्या केमिस्ट्री पाहून चाहते घायाळ झाले. दोघांचा अॅक्शन, अभिनयाचं चाहत्यांनी कौतुक केलं आहे. अनेक चाहत्यांनी 'टायगर ३' ला ब्लॉकबस्टर चित्रपट म्हटलंय.

यात शाहरुख खान आणि हृतिक रोशनचे कॅमिओ देखील आहेत. त्याची एन्ट्री पाहून चित्रपटगृहात संवाद ऐकून येत नाही ऐकू येतात फक्त प्रेक्षकांच्या शिट्ट्या. याशिवाय इमरान हाश्मीच्या खलनायकाच्या भूमिकेनेही लोकांचे खूप मनोरंजन केलंय. अॅडव्हान्स बुकिंग आणि ऑक्यूपेंसी रिपोर्टवरून टायगर-३ चा चित्रपट पहिल्या दिवशी तब्बल ४० कोटी रुपयांची कमाई करू शकतो.

या आकड्यांपेक्षाही जास्त कमाई करू शकतो, असंही काही जाणकार म्हणत आहेत. तर हा चित्रपट जगभरात १०० कोटी रुपयांची ओपनिंग करेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local: प्रवासी लोकलखाली आल्याने पश्चिम रेल्वेचे वाहतूक विस्कळीत; पाहा VIDEO

Trisha Krishnan: त्रिशा कृष्णनची राजकारणात एन्ट्री? पोटनिवडणूक लढवण्याची शक्यता

नंदूरबारमध्ये अग्नितांडव! नवापूर MIDC मध्ये कंपनीला भीषण आग, एकापोठापाठ ५ स्फोटामुळे परिसर हादरला

Maharashtra News Live Update: नालासोपारात गटारावरील जाळीत महिलेचा पाय अडकला

Kasara-Manmad Railway: पाच तालुके अन् ४५ गावातून धावणार कसारा-मनमाड रेल्वे; नाशिक-मुंबई प्रवास होणार जलद

SCROLL FOR NEXT