Threat Letter To Salman Khan Exclusive On Saam Tv  सूरज सावंत
मनोरंजन बातम्या

Mumbai: सलमान खानला धमकीचं पत्रं; 'G.B. L.B.' नावाने धमकी, पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये

Salman Khan Threat Letter By 'G.B. L.B.' : यानंतर पोलीस सलमान खानच्या घरी पोहोचले असून त्याच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

सूरज सावंत

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) आणि त्याचे वडील सलीम खान (Salim Khan) यांना धमकीचे पत्र (Threat Letter) मिळाले आहे. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी (Bandra Police) अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. हे धमकीचे पत्र सलीम खान यांच्या सुरक्षा रक्षकाला मिळाले आहे. या पत्रात हिंदी भाषेत लिहीलंय की, "सलीम खान, सलमान खान खूपच लवकर तुमचा मुसेवाला होणार आहे" अशा दोन ओळींचं धमकीपत्र सलमानला मिळालं आहे. यात धमकी देणाऱ्याचं स्पष्ट नाव देण्यात आलेलं नाही, पण धमकी देणाऱ्याने आपलं नाव 'G.B. L.B.' असं लिहिलंय. त्यामुळे हे धमकी देणारे नेमके कोण आहेत याचा तपास पोलीस घेत आहेत. यानंतर पोलीस सलमान खानच्या घरी पोहोचले असून त्याच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. (Threat Letter To Salman Khan Exclusive On Saam Tv)

हे देखील पाहा -

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अभिनेता सलमान खान याला मिळालेले धमकीचे पत्र त्याचे वडील सलीम खान यांच्या सुरक्षा रक्षकाला मिळाले आहे. सलमान ज्या ठिकाणी वॉकला जातो, त्या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबतो, त्या बाकड्यावर मिळाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

या पत्रात सलमान धमकी दिली आहे. या पत्रात सलमान आणि सलीम खान या दोघांना गंभीर धमकी दिली आहे. 'मूसा वाला जौसा कर दूंगा' अशा आशयाचे हे पत्र आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू करुन, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आहेत. सलमानला आलेल्या धमकीच्या पत्रानंतर मुंबई पोलिसांनी त्याच्या सुरक्षेत वाढ केली आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील खराडी भागात आगीची घटना

भाजपची राज्यसभेसाठी ११ नावांची घोषणा; २ बड्या केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होणार?

8th Pay Commission : कामाची बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या टेक होम पगारात मोठी वाढ? सरकार लागू करू शकतं हा फॉर्म्यूला

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

SCROLL FOR NEXT