मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार(Akshay Kumar) एका वर्षात सर्वात जास्त चित्रपट करतो. तशी त्याची इंडस्ट्रीत ओळख आहे. त्याच्या चित्रपटांनाही तेवढीच पसंती मिळते. परंतु सध्या तो बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरत आहे. ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या अक्षय कुमारच्या 'रक्षा बंधन'(RakshaBandhan) या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात केली. रक्षाबंधन या सणासाठी वेळेवर प्रदर्शित करूनही या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्याचबरोबर वीकेंडलादेखील हा चित्रपट काही विशेष कमाई करू शकला नाही. रविवारच्या कमाईत थोडी वाढ झाली होती, पण पहिल्या सोमवारी हा चित्रपट पुन्हा घसरताना दिसला. पाचव्या दिवसाचे कलेक्शनही समोर आले आहे, जे अक्षयसाठी तसेच या चित्रपटाच्या निर्मात्यांसाठीही निराशाजनक आहे.
अक्षय कुमारचे २०२२ साली रिलीज झालेले 'बच्चन पांडे' आणि 'सम्राट पृथ्वीराज चौहान' हे दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले आहेत आणि आता 'रक्षा बंधन' या चित्रपटाची कमाई पाहता, अभिनेता अक्षय कुमारची क्रेझ चाहत्यांमध्ये कमी होत चालली आहे. प्रेक्षकांअभावी चित्रपटाचे शो देखील रद्द करावे लागले आहेत. असेच सुरू राहिल्यास अक्षय कुमारचा एकाच वर्षातील हा तिसरा फ्लॉप चित्रपट असेल आणि या वर्षी तो फ्लॉपची हॅट्ट्रिक करेल, जी त्याच्या करिअरसाठी आणि ब्रँड व्हॅल्यूसाठी खूप वाईट आहे
'रक्षाबंधन'च्या कमाईत दिवसेंदिवस ज्याप्रकारे घट होताना दिसत आहे, त्यावरून अक्षयची क्रेझ कमी झाल्याचे दिसते. पहिल्या दिवसाच्या आकडेवारीनुसार, चौथ्या दिवसाच्या तुलनेत 'रक्षा बंधन'च्या कमाईत १५ टक्क्यांनी घट झाली आहे. आधीच या चित्रपटाची कमाई अपेक्षेपेक्षा कमी झाली आहे आणि आता पुन्हा एकदा सोमवारी झालेले कलेक्शन निर्मात्यांसाठी चिंतेचा विषय आहे.
चित्रपटाने पहिल्या दिवशी ९ कोटी, दुसऱ्या दिवशी सुमारे ६ ते ६.४० कोटी, तिसऱ्या दिवशी ६.८० कोटींची कमाई केली. मात्र, रविवारी थोडीशी आघाडी घेत 'रक्षा बंधना'ने सुमारे ८ कोटींची कमाई केली. आता पहिल्या सोमवारचे प्रारंभिक कलेक्शन देखील समोर आले आहे, त्यानुसार अक्षयच्या चित्रपटाने पाचव्या दिवशी केवळ ६ कोटींचा गल्ला जमवला आहे.
आनंद एल राय दिग्दर्शित, 'रक्षा बंधन'ची कथा एका मध्यमवर्गीय भावाभोवती फिरते, जो आयुष्यातील संकटांमध्येही आपल्या बहिणींची रक्षा करताना दिसतो. अक्षयने या चित्रपटात चार बहिणींच्या भावाची भूमिका साकारली आहे. अक्षय अशा भावाची भूमिका सकारात आहे ज्याला आपल्या बहिणींचे लग्न चांगल्या घरात करायचे आहे. या सगळ्यात त्याचे स्वतःचे लग्नही रखडले आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र काम करताना दिसले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.