Actress Avoid Become Mother Saam TV
मनोरंजन बातम्या

Actress Prioritize Their Career: मातृत्वाच्या सुखापेक्षा करिअरला प्राधान्य देणाऱ्या अभिनेत्री; वाचा संपूर्ण यादी

Actress Prioritize Their Career Over Motherhood: सिनेविश्वातील 'या' अभिनेत्रींनी मातृत्वाचं सुख नाकारलं अन् करिअरला प्रथम प्राधान्य दिलं

Ruchika Jadhav

Actress Prioritize Their Career: सिनेविश्वात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी आपल्या करिअरसाठी आयुष्यातील अनेक मोठमोठ्या सुखांचा त्याग केला आहे. आई होणं हे प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील मोठं स्वप्न असतं. मात्र या अभिनेत्रींनी आपल्या आई होण्याच्या सुखाला मागे ठेवत संपूर्ण आयुष्यभर करिअरला प्राधान्य दिलं आहे. (Latest Marathi News)

आयशा जुल्का

आयशा जुल्का ही सिनेविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेत्री आहे. आपल्याला मुलं नको असल्याचं तिने स्वत: स्पष्ट सांगितलं आहे. मला मुलं नाहीत. कारण मुलं असावी अशी माझी कधी इच्छा झाली नाही. माझा हा निर्णय मी माझ्या कुटुंबियांना सांगितला आहे. त्यांना तो मान्य असल्याने मला आनंद वाटतो, असं अभिनेत्रीने म्हटलं आहे.

रुबिना दिलेक

बिग बॉस १४ ची विजेती अभनेत्री रुबिना दिलेक सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. तिला आपल्या आयुष्यात सध्या मुलं नको असल्याचं तिने माध्यमांसमोर सांगितलं होतं. मुंल जन्माला घालणे ही फार मोठी जबाबदारी असते.

ती जबाबदारी स्विकारण्यासाठी दोघांनी एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे. तसेच आपण ज्या बाळाला जन्म देतो त्याचे व्यवस्थित पालनपोषण करणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे मला सध्या मुलं नको असलं तरी भविष्यात माझा निर्णय बदलू शकतो. असं या अभिनेत्रीने म्हटलं आहे.

विद्या बालन

आपल्या अभिनयाने रुपेरी पडद्यावर चार चाँद लावणारी अभिनेत्री विद्या बालन आणि सिद्धार्थ रॉय कपूर या दोघांच्या लग्नाला जवळपास ११ वर्षांचा काळ लोटला आहे. मात्र अद्यापही विद्याने आई होण्याचा निर्णय घेतलेला नाही. विद्या बाळाविषयी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर देताना म्हणाली होती की, माझे चित्रपट हे मला माझ्या बाळांसारखे आहेत. त्यामुळे मला आतापर्यंत २० मुलं आहेत. असं तिने एका मुलाखतीत म्हटलं आहे.

पारुल चव्हान

'ये रिश्ता क्या कहलाता है 'या' मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्री पारुलने देखील आपल्याला मुलं नको असल्याची कबुली दिली आहे. मला मुलं नको आहेत आणि हे फक्त माझं नाही तर माझ्या पतीचं देखील मत आहे. माझ्या सासरी देखील माझ्या विचारांना विरोध केला जात नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bihar Election Result Live Updates: पोस्टल मतमोजणी संपली, सुरूवातीचे कल एनडीएच्या बाजूने

Accident News : नवले पुलाचा उतार ठरतोय मृत्यूचा सापळा, वर्षभरातील अपघाताचा आकडा धक्कादायक, घटनेला जबाबदार कोण?

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी टेन्शन वाढवणारी बातमी! 'या' जिल्ह्यातून २४ हजार महिला अपात्र; यादीत तुमचे नाव तर नाही ना?

Bihar Election Result : बिहारमध्ये सत्ता कुणाकडे? पहिला कौल भाजपच्या बाजूने, एनडीएची मोठी आघाडी

Maharashtra Live News Update: पंढरपुरात स्वाभिमानी शेतकरी संघटना उस दरासाठी आक्रमक

SCROLL FOR NEXT