Haddi first look Saam Tv
मनोरंजन बातम्या

Haddi first look: 'हड्डी'च्या फर्स्ट लूकमध्ये ही 'हसीना' कोण? कितीही निरखून बघितलं तरी ओळखणे कठीण

लवकरच 'हड्डी' हा आगामी चित्रपट येत आहे, ज्याचा फर्स्ट लूक काही वेळापूर्वी रिलीज झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, जे नेहमीच वेगवेगळे प्रयोग करतात. आता लवकरच 'हड्डी'(Haddi) हा आगामी चित्रपट येत आहे, ज्याचा फर्स्ट लूक काही वेळापूर्वी रिलीज झाला आहे. फर्स्ट लूक बघितल्यानंतर या चित्रपटाबद्दलची उत्सुकता खूप वाढली आहे. झी स्टुडिओच्या 'हड्डी' या चित्रपटातील फर्स्ट लूकच्या मोशन पोस्टरमध्ये एक सुंदर महिला खुर्चीवर बसलेली दिसत आहे. परंतु ही सुंदर अभिनेत्री कोण हे बघताक्षणी कोणालाच ओळखता येत नाही. ही सुंदर महिला म्हणजे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी(nawazuddin siddiqui).

होय, या चित्रपटाच्या मोशन पोस्टरमध्ये तुम्ही नवाजुद्दीन सिद्दीकीला स्त्री भूमिकेमध्ये बघणार आहात. अशा भूमिकेत नवाज यापूर्वी कधीही दिसला नव्हता. या मोशन पोस्टरमध्ये नवाजुद्दीन फिमेल लूकमध्ये दिसत आहे. या पोस्टरमध्ये त्याचे हात रक्ताने माखले असून त्याने राखाडी रंगाचा चमकदार गाऊन घातला आहे. नवाजचा हा लूक पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. 'हड्डी' या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले असून, हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. नवाजच्या लूकमुळे चित्रपटाबाबत फारशी माहिती मिळत नसली तरी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढल्याचे स्पष्ट झाले आहे.

निर्मात्यांच्या मते हा चित्रपट एक रिव्हेंज ड्रामा आहे. चित्रपटाच्या शेअर केलेल्या पोस्टरमध्ये 'यापेक्षा सुंदर गुन्हा कधीच नव्हता' अशी कॅप्शन लिहिली आहे. आपल्या चित्रपटातील व्यक्तिरेखेबद्दल बोलताना नवाज म्हणाला, 'मी अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत, पण मी अशी भूमिका कधीच साकारलेली नाही. एक अभिनेता म्हणून हा चित्रपट मला काहीतरी नवीन करण्याची संधी देत ​​आहे'.

अक्षत अजय शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी ड्रॅग क्वीनची भूमिका साकारत आहे. ड्रॅग क्वीन हा पुरुषच असतात जे जड मेकअप आणि बोल्ड ड्रेस परिधान करत स्त्रियांप्रमाणे वागतात. हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच २०२३ मध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gyanesh Kumar: "ज्ञानेश कुमार चोर-डाकू, त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा!" मतचोरीवरून विरोधक एकवटले, दिल्लीतून मोठी घोषणा

Maharashtra News Live Update: भारताच्या लोकशाहीवर भाजपने हल्ला केलाय- राहुल गांधी

Eye Exercises : चष्म्यापासून सुटका हवी? रोज ५ मिनिटे करा 'हा' व्यायाम, डोळ्यांची नजर होईल तीक्ष्ण

Pune Politics: अर्ज सुरू, फिल्डिंग जोरात; पण ‘तो’ उमेदवार कोण? पुणे पदवीधर-शिक्षक निवडणुकीत मोठा ट्विस्ट

IND vs WI : सिराज आजही बाकावरच, या स्टार खेळाडूचा पत्ता कट, प्लेईंग ११ मध्ये कुणाला मिळाले स्थान?

SCROLL FOR NEXT