Tiger 3 teaser
Tiger 3 teaser Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tiger 3 teaser : सलमान-कतरिनाची जोडी पुन्हा एकत्र दिसणार; चाहत्यांना पाहायला मिळणार जबरदस्त केमिस्ट्री

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडचा दबंग सलमान खान(Salman Khan) आणि अभिनेत्री कतरिना कैफचा (Katrina kaif) बहुप्रतिक्षित चित्रपट 'टायगर ३'(tiger 3) चा टीझर व्हिडिओ आज प्रदर्शित झाला आहे. सलमान आणि कतरिनाचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. वृत्तानुसार, १५ ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 'एक था टायगर' या चित्रपटाच्या पहिल्या भागानंतर हा तिसरा सिक्वेल १० वर्षांनंतर प्रदर्शित होणार आहे.

'टायगर ३' या चित्रपटाच्या टीझर व्हिडीओसोबत रिलीज डेटही समोर आली आहे. हा चित्रपट पुढील वर्षी ईदच्या दिवशी २१ एप्रिल २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कतरिना आणि सलमान पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहेत. जे पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.

सलमानच्या 'एक था टायगर' या चित्रपटाचा पहिला भाग २०१२ साली प्रदर्शित झाला होता. पाच वर्षांनंतर 'टायगर जिंदा है' २०१७ साली रिलीज झाला, जो त्याचा दुसरा सिक्वेल होता. आता तब्बल दहा आणि पाच वर्षांच्या कालावधीनंतर तिसऱ्या सिक्वेलने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे.

त्याच वेळी, अॅक्शन इमोशन आणि रोमान्सने परिपूर्ण 'टायगर ३' चा टीझर पाहिल्यानंतर, प्रेक्षक देखील त्याच्या दमदार ट्रेलरची वाट पाहत आहेत. विशेष म्हणजे २०१२ मध्येच 'एक था टायगर' या चित्रपटानेही थिएटरमध्ये धुमाकूळ घातला होता. सलमान खानचा हा चित्रपट देशभक्तीचे एक उत्तम उदाहरण आहे. अशा परिस्थितीत आज स्वतंत्र दिनाच्या दिवशी या चित्रपटाचा टीझर रिलीज होणे ही एक मोठी गोष्ट आहे.

सलमान खान आणि कतरिना कैफचा हा चित्रपट एकाच वेळी अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषेतील प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण करेल. तसेच या चित्रपटात कॅट आणि सलमान व्यतिरिक्त, इमरान हाश्मी देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सलमान खानच्या आधी आलेले दोन चित्रपट बॉक्स ऑफिसवर खास कामगिरी करू शकले न्हवते. अशा परिस्थितीत प्रेक्षकांना टायगर ३ कडून मोठ्या अपेक्षा आहेत. आता या चित्रपटातून सलमान प्रेक्षकांच्या अपेक्षांवर खरा उतरतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महाराष्ट्रात सूडाचं राजकारण कशाला हवं? इथं कट्टर विरोधकही धरतात एकमेकांचे पाय

Raj Thackeray: राज ठाकरे महायुतीला का हवेत? महायुतीसाठी मनसे घेणार 'राज'सभा

Baba Ramdev: बाबा रामवेदांना मोठा दणका! पतंजलीच्या 14 उत्पादनांवर बंदी

Gharat Ganpati : 'घरत गणपती' २६ जुलैला मराठी रुपेरी पडद्यावर

MI Vs LSG : मुंबईचा प्लेऑफचा पत्ता जवळपास कट; लखनौचा मुंबईवर ४ गडी राखून विजय

SCROLL FOR NEXT