Code Name Tiranga  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Code Name Tiranga Teaser : परिणीती चोप्राचा असा अवतार कधी बघितला नसेल! धमाकेदार एन्ट्री

परिणीती चोप्राच्या 'कोड नेम तिरंगा या आगामी चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्रा(Parineeti Chopra) बऱ्याच दिवसांपासून कोणत्याही चित्रपटात दिसली नव्हती पण आता ती लवकरच एक धडाकेबाज एन्ट्री करण्यास सज्ज आहे. 'कोड नेम तिरंगा'(Code Name Tiranga) या चित्रपटात परिणीती धमाकेदार स्टाईलमध्ये दिसणार आहे, ज्याची पहिली झलक म्हणजेच टीझर आज शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये परिणीतीला पाहून तुम्हीही थक्क व्हाल. हातात बंदूक, रक्ताने माखलेली परिणीती चोप्रा चित्रपटात गुप्तहेर म्हणून दिसणार आहे. परिणीती पहिल्यांदाच अशा प्रकारचा अॅक्शन चित्रपट काम करताना दिसणार आहे.

टीझरची सुरुवात एका मिशनने होते ज्यासाठी परिणीती चोप्राला निवडण्यात येते. एका सीनमध्ये परिणिती रक्ताने माखलेली दिसते, तर पुढच्याच क्षणी ती हातात बंदूक पकडून उभी दिसते. परिणीतीची ही स्टाईल सर्वांनाच आवडली असून परिणीती या चित्रपटात एॅक्शन मोडमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट १४ ऑक्टोबरला प्रदर्शित होत असून त्याचा ट्रेलरही लवकरच प्रदर्शित होणार आहे, मात्र त्याआधी आलेल्या या टीझरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

२०२१ मध्ये परिणीती चोप्राचा 'सायना' हा चित्रपट रिलीज झाला होता, ज्यामध्ये श्रद्धा कपूर सायनाची भूमिका साकारणार होती, पण नंतर परिणीतीला ही भूमिका मिळाली. हा सायना नेहवालचा बायोपिक होता ज्यात परिणीतीला चांगलीच पसंती मिळाली होती पण त्यानंतर परिणीतीचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. मधल्या काळात ती 'हुनरबाज' या रिअॅलिटी शोला जज करताना दिसली होती. आता वर्षभरानंतर परिणीती कम बॅक करण्यासाठी सज्ज झाली आहे. तसेच 'कोड नेम तिरंगा' या चित्रपटात त्याच्यासोबत हार्डी संधूही एका दमदार भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुजोर खासदाराची पत्रकारांना धमकी, शिंदेच्या खासदारावर काय कारवाई होणार?

पत्रकारांना शिवीगाळ, धमकी देणारे खासदार संजय दिना पाटील नरमले; दिलगिरी व्यक्त केली, नेमकं काय घडलं? सर्व सांगितलं

Face care: मॉइश्चरायझ आणि स्मूथ त्वचेसाठी रात्री झोपण्यापूर्वी लावा ही पेस्ट, २ आठवड्यात दिसेल फरक

मुंबई सायबर पोलिसांची मोठी कारवाई; 3206 फसवणुकीच्या गुन्ह्यांत सहभाग असलेल्या टोळीचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: संजय दिना पाटील यांच्या विधानाच्या निषेधार्थ धुळ्यात जोडो मारो आंदोलन

SCROLL FOR NEXT