Bigg Boss Marathi will start soon
Bigg Boss Marathi will start soon Saam Tv
मनोरंजन बातम्या

Big Boss Season 4: बिग बॉसच्या घरात लवकरच होणार किलबीलाट, तारीख ठरली पण स्पर्धकांचे काय होणार?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक टीआरपी असलेला शो म्हणजे 'बिग बॉस'(Bigg Boss). या शोची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. बिग बॉस मराठीचे ३ सीझन प्रसारित झाले असून चौथ्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात लोकप्रिय असलेल्या या शो ची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे. अखेर प्रेक्षकांची प्रतिक्षा संपलेली असून निर्मात्यांनी 'बिग बॉस'च्या चौथ्या सीझनच्या तारखेची घोषणा केली आहे.

बिग बॉस मराठीचे पहिले तीन सीझन टेलिव्हिजनवर तुफान लोकप्रिय ठारले. त्याच पार्श्वभूमीवर चौथ्या सीझनची चाहुल लागुन राहिली होती. काही दिवसांपूर्वी महेश मांजरेकरांचा(Mahesh Manjrekar) टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. आता या शोची तारीख देखील समोर आली आहे. 'बिग बॉस'चा चौथा सीझन येत्या २ ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांचा उत्साह चांगलाच शिगेला पोहोचला आहे.

शंभर दिवसात एकत्र राहून हे स्पर्धक एकमेकांची कधी काळजी घेतात तर कधी जीव घ्यायला ही पुढे मागे पाहत नाहीत. वेगवेगळे टास्क करणाऱ्या या स्पर्धकांमध्ये चढाओढ पाहायला मिळते. दरम्यान महेश मांजरेकर या शोच्या होस्टिंगची धुरा सांभाळत असून, या शो मध्ये कोणकोणते कलाकार स्पर्धक सहभागी होणार याची ओढ प्रेक्षकांना लागली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Josh Baker Death: इंग्लंडच्या २० वर्षीय जोश बेकरच्या मृत्यूचं नेमकं कारण काय?

Gondia News : १५० रुपये क्विंटलने मोबदला मिळेपर्यंत भरडाई बंद ठेवण्यावर राईस मिलर्स ठाम; ५४० कोटीचे धान पडून

Maval News: अंघोळीसाठी पाण्यात उतरले, पोहताना दम लागला; इंद्रायणी नदीत बुडून दोन भावंडांचा मृत्यू

WhatsApp Account Ban: व्हॉट्सअॅपकडून भारतात गेल्या वर्षी ७ कोटी अकाउंट्सवर बंदी; काय आहेत प्रमुख कारणे?

Chitra Wagh : "मी चारित्र्यवान कलावंत, माफी मागा नाहीतर...", 'त्या' अभिनेत्याचा चित्रा वाघ यांना थेट इशारा

SCROLL FOR NEXT