The Kerala Story Director File Police Complaint Instagram @sunshinepicturesofficial
मनोरंजन बातम्या

'The Kerala Story' करणार परदेशात नवा विक्रम; चित्रपट झाला World Wide Released

The Kerala Story Released World Wide: 'द केरला स्टोरी'च्या भारतातील यशानंतर निर्मात्यांनी हा चित्रपट जगभरात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला.

Pooja Dange

The Kerala Story Box Office Collection: 'द केरला स्टोरी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगले यश मिळवले आहे. भारतात यश मिळविल्यानंतर हा चित्रपट आता शुक्रवारी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

'द केरला स्टोरी'च्या भारतातील यशानंतर निर्मात्यांनी हा चित्रपट जगभरात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. हा चित्रपट देशातील 60 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. आता 'द केरला स्टोरी जगभरातील ४० हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

'द केरला स्टोरी' चित्रपटाची वाढतो लोकप्रियता आणि वर्ल्डवाईड होणारे चित्रपटाचे प्रदर्शन यामुळे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सुदिप्तो यांनी त्यांचा आनंद व्यक्त करत एक ट्विट देखील केले आहे आणि चित्रपटाशी संबंधित अपडेट देखील दिले आहे. (Latest Entertainment New)

सुदिप्तो सेन यांनी 'द केरला स्टोरी' चित्रपटाविषयी ट्विट करत म्हटले आहे की, "चित्रपटाला आतापर्यंत भारतात 6000,000 हून अधिक लोकांनी पहिले आहे. आज एक नवीन अध्याय सुरू होत आहे.

द केरला स्टोरी चित्रपट 40 हून अधिक देशांमध्ये प्रदर्शित होत आहे... अधिकाधिक लोक या चित्रपटाशी जोडले जात आहेत. भरपूर आशीर्वाद, प्रेम आणि कौतुक आपल्याला भारावून टाकतील. यामुळे आपल्याला अधिक जबाबदार, अधिक नम्र, अधिक प्रिय असू."

केरला स्टोरी बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत असेल, परंतु रिलीजपूर्वी चित्रपटाला बऱ्याच विवादांना सामोरे जावे लागले. हे प्रकरण सुप्रीम कोर्टातही पोहोचले होते आणि हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये अशी मागणी देखील करण्यात आली होती.

'द केरला स्टोरी'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनविषयी बोलायचे झाले तर, प्रदर्शनाच्या चार दिवसांतच चित्रपटाने त्याच्या बजेट इतकी कामेकेली होती. आता ११ मे रोजी चित्रपटाने १२.५० कोटीचे कलेक्शन केले आहे. 'द केरला स्टोरी' चित्रपटाने सातव्या दिवशी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर ८१. ३६ कोटींची कोटींची कमाई केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं-चांदीच्या दरात आज वाढ झाली की घसरण? खरेदीला जाण्यापूर्वी वाचा आजचे दर

Accident News : दुर्दैवी! थांबलेल्या ट्रकला कारची जोरदार धडक, ३ पोलीस उपनिरीक्षकांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

Baramati Election: बारामती बिनविरोध तर राहुरीबाबत सस्पेन्स कायम; पोटनिवडणुका जाहीर होताच विरोधकांनी आखली रणनीती

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यात घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर, पुरवठा विभागाची चार ठिकाणी कारवाई

Cricketer Retirement : चॅम्पियन्स ट्रॉफी विजेत्या कर्णधाराची क्रिकेटमधून निवृत्ती; सलग ११ टी २० मालिका जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT