The Kerala Story The Kerala Story On OTT  Saam Tv
मनोरंजन बातम्या

The Kerala Story On OTT : सुदिप्तो सेनच्या 'द केरला स्टोरी'ची अडवणूक ; चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार नाही...

Sudipto Sen On Movie Mafiya : बॉलिवूडमधील काही वर्गांने एकत्र येऊन आम्हाला ही शिक्षा दिली आहे", असे सुदिप्तो सेन यांनी सांगितले आहे.

Pooja Dange

The Kerala Story Not Getting OTT Platform : सुदिप्तो सेन दिग्दर्शित 'द केरला स्टोरी' बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आहे. चित्रपटाची चर्चा आजही सर्वत्र होत आहे. या चित्रपटावर अनेकांनी टीका केली असे असले तरी प्रेक्षकांनी चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केला. पण आता या चित्रपटाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर खरेदी करण्यासाठी कोणीच तयार नसल्याची माहिती समोर येत आहे.

सुदिप्तो सेन दिग्दर्शित 'द केरला स्टोरी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई केली आहे. या चित्रपटाचं बजेट ४० कोटी होतं तर चित्रपटाची कमाई २४२ कोटी एवढी झाली आहे. (Latest Entertainment News)

'द केरला स्टोरी' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकलेला असतानाही बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. ज्या लोकांनी हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला नाही ते लोक आता चित्रपट ओटीटीवर येण्याची वाट पाहत आहेत. पण या प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी समोर येत आहे.

'द केरला स्टोरी' हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार असल्याची माहिती होती. पण या चित्रपटाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्यासाठी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, मागच्या काही दिवसांपासून चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे अशा बातम्या येत होत्या. पण आता चित्रपटाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर कोणीच खरेदी करत नाही अशी माहिती मिळाली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, सुदिप्तो सेन यांनी म्हटले आहे की, "आम्हाला कोणत्याही ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन अपेक्षित ऑफर आली नाही". चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होण्याच्या अफवा आहेत असे सुदिप्तो सेन यांनी स्पष्ट केले आहे.

"चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील यशामुळे बॉलिवूडमधील काही लोक चित्रपटावर नाराज आहेत. त्यामुळेच त्यांनी ही शिक्षा दिली आहे. बॉलिवूडमधील काही वर्गांने एकत्र येऊन आम्हाला ही शिक्षा दिली आहे", असे सुदिप्तो सेन यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Narendra Modi : 'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर PM नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, राज ठाकरेही म्हणाले, अविश्वसनीय...'

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

SCROLL FOR NEXT