Adipurush Free Ticket For Special People Saam Tv
मनोरंजन बातम्या

Free Tickets Of Adipurush Movie: ही संधी गमावू नका! ‘आदिपुरुष’चे 10 हजार तिकीट फ्रीमध्ये, ‘असा’ करुन घ्या फायदा...

Adipurush Free Ticket: ‘द काश्मीर फाईल्स’चे निर्माते अभिषित अग्रवाल यांनी ‘आदिपुरुष’च्या प्रेक्षकांसाठी एक महत्वाची घोषणा केली आहे.

Chetan Bodke

Producer Abhishek Agarwal Is Giving Adipurush Tickets: ‘आदिपुरुष’ चित्रपटाची प्रेक्षक गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत आहे. हा चित्रपट येत्या १६ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रभास, क्रिती सेनॉन, सनी सिंग, देवदत्त नागे आणि सैफ अली खान हे सेलिब्रिटी चित्रपटात झळकणार आहेत. कालच या चित्रपटाचा फायनल ट्रेलर प्रदर्शित झाला असून हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंदीस उतरला आहे. अशातच आता चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी नाही तर ‘द काश्मीर फाईल्स’ च्या निर्मात्यांनी ‘आदिपुरुष’च्या प्रेक्षकांना एक भेट दिली आहे.

‘द काश्मीर फाईल्स’चे निर्माते अभिषित अग्रवाल यांनी एक मोठी घोषणा केली आहे. ‘आदिपुरुष’ची १०,००० तिकिटे मोफत वाटली जाणार,असल्याची माहिती मिळत आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ आणि ‘कार्तिकेय २’चे निर्माते ट्वीट करत म्हणतात, “हा ‘आदिपुरुष’ साजरा करण्याचा प्रसंग आहे. श्रीरामावरील माझी भक्ती आणि श्रद्धा यामुळे मी ‘आदिपुरुष’साठी १०,००० तिकिटे विकत घेण्याचे ठरवले आहे. हे विकत घेतलेले तिकिट तेलंगणातील सरकारी शाळा, अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमांना दान करायचे आहे. जर तुम्हाला तिकिटे मिळवायची असतील तर कृपया खाली दिलेला फॉर्म भरा.” अशी पोस्ट त्यांनी लिहिलीय.

नुकतेच गेल्या काही दिवसांपुर्वी ‘आदिपुरुष’च्या निर्मात्यांनीही चित्रपटाबद्दल एक वेगळीच ऑफर काढली आहे. निर्मात्यांनी थिएटरमध्ये, प्रत्येक शोमध्ये हनुमानासाठी एक जागा राखीव ठेवण्याची माहिती दिली आहे. त्या स्क्रिनिंगसाठी देव स्वत: येणार असल्याचे निर्मात्यांचे मत आहे. सोबतच अशी श्रद्धा आहे की, जिथे प्रभू श्री रामाचे वास्तव असते, तिथे हनुमानाचा वास असतो. चित्रपटाच्या निर्मात्यांनी असे पहिल्यांदाच केले आहे. या निर्णयानंतर निर्मात्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. हा चित्रपट बंपर कमाई करेल आणि सर्व रेकॉर्ड पुन्हा एकदा मोडतील अशी अपेक्षा सध्या सर्वांकडूनच व्यक्त केली जात आहे.

‘पठान’पेक्षाही सर्वाधिक बजेट असलेल्या या चित्रपटात कलाकारांनी चांगलेच तगडे मानधन घेतल्याची चर्चा आहे. चित्रपटात प्रभासने प्रभू रामाची, क्रितीने सीतेची, सनी सिंगने श्रीरामाचे छोटे भाऊ लक्ष्मण यांची भूमिका साकरली आहे. तर सर्वाधिक चर्चेत असलेल्या सैफ अली खानने रावणाची भूमिका साकारली. प्रभासने १५० कोटी, सैफ अली खानने १२ कोटी, क्रिती सेननने ३ कोटी तर, सन्नी सिंगने १.५ कोटी इतकं मानधन स्विकारलं आहे. कलाकारांच्या या तगड्या मानधनामुळे आणि बिग बजेट चित्रपटामुळे चित्रपटाचं एकूण बजेट ७०० कोटींवर पोहोचलं आहे. अर्थात या सगळ्या आकड्यांविषयी निर्मात्यांकडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: IIT मधून इंजिनियरिंग, जर्मनीतील नोकरी सोडली; UPSC दिली; आधी IPS नंतर IAS; गरिमा अग्रवाल यांचा प्रवास

Maharashtra Live News Update: पुण्यात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव, दीड वर्षात 40 हजारांहून अधिक नागरिक जखमी

Gajkesri Rajyog: 12 वर्षांनंतर बनतोय गजकेसरी राजयोग; गुरु-चंद्राच्या कृपेने मिळणार

Pitru Paksha: पितृ पक्षात ४ ग्रह बदलणार रास; मेष, मिथुन सह अजून २ राशींचं नशीब फळफळणार

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

SCROLL FOR NEXT