The Great Indian Kapil Show 
मनोरंजन बातम्या

The Great Indian Kapil Show बंद पडणार आहे का? अर्चना पूरण सिंहने व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

Kapil Show : सोशल मीडियावर या शोसंदर्भात वेगळीच माहिती शेअर केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कपिल शर्मा याचा कॉमेडी शो द ग्रेट इंडियन कपिल शो बंद होतोय, अशी चर्चा होतेय. द ग्रेट इंडियन कपिल बंद पडत असल्याचे कळाल्यापासून चाहत्यांनी नाराजी वर्तवलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: ग्रेट कॅमेडियन म्हणून कपिल शर्माने आपली वेगळी ओळख तयार केलीय. कपिल शर्माची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग आहे. सध्या द ग्रेट इंडियन कपिल शो नेटफ्लिक्सवर प्रसारित केला जातोय. याचदरम्यान या शोसंदर्भात धक्कादायक वृत्त माध्यमांमध्ये पसरत आहे. हा शो परत बंद होणार असल्याचं म्हटलं जात आहे, मात्र यावर अर्चना पुरन सिंह यांनी मोठा खुलासा करत सत्य गोष्ट सांगितलीय.

सोशल मीडियावर या शोसंदर्भात वेगळीच माहिती शेअर केली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून कपिल शर्मा याचा कॉमेडी शो द ग्रेट इंडियन कपिल शो बंद होतोय, अशी चर्चा होतेय. द ग्रेट इंडियन कपिल बंद पडत असल्याचे कळाल्यापासून चाहत्यांनी नाराजी वर्तवलीय. ओटीटीवर शो चालत नसल्याने शो बंद पडत असल्याचे म्हटलं जात आहे. नेटफ्लिक्सने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. याचदरम्यान अर्चना पूरण सिंह हिने व्हिडिओ शेअर करत मोठा खुलासा केलाय.

तिच्या या व्हिडिओमुळे चाहत्यांमध्ये उत्साह बघायला मिळतोय. कॉमेडी शो द ग्रेट इंडियनमध्ये सर्वात अगोदर नीतू कपूर या पोहचल्या होत्या. हेच नाही तर आमिर खान हा देखील कॉमेडी शो द ग्रेट इंडियन शोमध्ये पोहचलाय. पोस्ट शेअर करत अर्चना पूरण सिंहने म्हणाली आहे की, ‘हे लाफ्टर कमी नाही होणार, कारण अजून एपिसोड्स यायचे आहेत.

त्यामुळे या पोस्टवरून स्पष्ट होतंय की, शो बंद पडणार नाहीये. अर्चना पूरण सिंहने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये जान्हवी कपूर, राजकुमार राव, बादशाह, सानिया मिर्झा हे स्टार्सही दिसताहेत. हा व्हिडिओ सोशल मीडिया आता तूफान व्हायरल होतोय. कपिलच्या शोवर आमिर खानने हजेरी लावली होती. त्याने अनेक मोठं मोठे खुलासे केले होते. आता नुकताच कॉमेडी शो द ग्रेट इंडियनमध्ये सनी देओल आणि बाॅबी देओल हे देखील पोहचले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Politics:शिवसेनेच्या नगरसेवकाला भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून मारहाण; कुटुंबियाचा आरोप,राजकारण तापलं

T20 World Cup: बांगलादेश आऊट! टी-२० विश्वचषकात खेळण्यास नकार

बदलापुरात ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, स्कूल व्हॅन फोडण्याचा प्रयत्न

महाराष्ट्रातील कोणत्या शहरात किती कोटींची गुंतवणूक आली? मुख्यमंत्र्यांनी सांगितला आकडा

Friday Horoscope : जुन्या कर्जापासून मुक्त होणार, प्रेमात यश मिळणार;५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

SCROLL FOR NEXT