The Enterepreneur Documentary
The Enterepreneur Documentary Saam Tv
मनोरंजन बातम्या

The Entrepreneur: एका छोट्या गावातील शिकलेला मुलगा परदेशात ठेवतोय नोकरीवर... धैर्याची अविश्वसनीय कहाणी

Chetan Bodke

The Entrepreneur: अविश्वसनीय धाडसामुळे आणि जिद्दीमुळे अशक्य वाटणाऱ्या आव्हानांना सामोरे जात, यश संपादन करणे, ही काल्पनिक वाटणारी कथा आपल्याला खऱ्या आयुष्यातही कधीतरी ऐकायला मिळते. प्रतीक शेलार यांचे 'द आंत्रप्रेन्युअर' (The Entrepreneur) हे त्याचे एक उदाहरण. तुळजापूरमधील एका छोट्या गावातील मुलगा ते लंडनमधील नागरिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा एक भारतीय उद्योजग. हा प्रवास त्यांच्यासाठी नक्कीच सोप्पा नव्हता. त्यांचा हा संघर्षमयी प्रवास आपल्याला 'द आंत्रप्रेन्युअर' या माहितीपटात पाहायला मिळणार आहे.

प्रतीकने भारतातील एका छोट्या शहरात सामान्य जीवन जगताना विलक्षण यश मिळविण्याचे स्वप्न कसे पाहिले आणि या एका स्वप्नाने त्याला यश आणि आत्म-शोधाच्या मार्गावर कसे नेले, याची कथा कथन केली आहे. युट्युबवर सात भागांत उपलब्ध असलेला हा प्रवास प्रत्येकासाठीच प्रेरणादायी आहे.

महाराष्ट्रातील तुळजापूर या पवित्र शहरात १९८८ साली जन्मलेल्या प्रतीक यांना लहानपणापासूनच मनोरंजन क्षेत्राची, चित्रपटांची आवड होती. त्यांची ही आवड एक उद्योजक म्हणून त्यांच्या भविष्याचा मार्ग मोकळा करेल, हे त्यांच्या पालकांच्या ध्यानीमनीही नव्हते. एका सामान्य मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातून आलेल्या प्रतीक यांचे वडील प्रवीण नानासाहेब शेलार जे तुळजापूर आणि उस्मानाबाद नगरपरिषदमध्ये अभियंता म्हणून कार्यरत होते.

प्रतीक यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी आयआयटी मधून पदवीधर व्हावे आणि यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन कलेक्टर व्हावे.परंतु, प्रतीक यांची यशस्वी जीवनाची कल्पना केवळ त्यांच्या कुटुंबापुरती, शहर किंवा समाजापुरती मर्यादित नव्हती, तर त्यांना आपल्या देशाला अभिमान वाटेल, असे यश संपादन करायचे होते.

प्रतीक यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांनी आयआयटी मधून पदवीधर व्हावे आणि यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन कलेक्टर व्हावे.परंतु, प्रतीक यांची यशस्वी जीवनाची कल्पना केवळ त्यांच्या कुटुंबापुरती, शहर किंवा समाजापुरती मर्यादित नव्हती, तर त्यांना आपल्या देशाला अभिमान वाटेल, असे यश संपादन करायचे होते.

२००७ मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतानाच, प्रतीकना ‘हमने जीना सिख लिया’ नावाच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. ज्यात सिद्धार्थ चांदेकर, मृण्मयी देशपांडे, ओम भुतकर यांच्याही भूमिका होत्या. त्यांचाही हा पहिलावहिला सिनेमा होता. या अनुभवामुळे प्रतीक यांची अभिनय क्षेत्राविषयीची रुची अधिकच वाढवली आणि या क्षेत्रातच करिअर करण्याचा त्याचा संकल्प अधिकच मजबूत झाला. ज्यावेळी त्यांनी अभिनेता होण्याचा दृढ निश्चय केला, त्याचवेळी नेमकं कौटुंबिक दबावामुळे त्यांना माघार घ्यावी लागली.

इंडस्ट्रीत ‘बॅक-डोअर एंट्री’ घेत प्रतीक यांनी एका प्रॉडक्शन हाऊसमध्ये मार्केटिंग हेड म्हणून काम करण्याचे ठरवले आणि अशा प्रकारे त्यांनी मार्केटिंगमध्ये एमबीए करण्याचा निर्णय घेत, २०११ पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्पुटर टेक्नॉलॉजी (पीआयसीटी) मध्ये प्रवेश घेतला. याच काळात त्यांना त्यांचे पहिले प्रेम मिळाले. मात्र आत्म-शंका आणि संभ्रमाच्या स्थितीत असल्याने हे नाते बहरण्यापूर्वीच संपुष्टात आले. हे वैयक्तिक नुकसानच संघर्षाच्या सुरुवातीच्या काळात यश मिळवण्यासाठीचे एकमेव प्रेरणा स्त्रोत बनले.

प्रतिकने (पीआयसीटी) मध्ये टॉप ३ मध्ये येऊन थेट कॉव्हेन्टरी युनिव्हर्सिटी , इंग्लंड गाठले. तिथे त्यांना संधींचे संपूर्ण असे एक जग दिसले आणि त्यांनी यूकेला आपली ‘कर्मभूमी’ बनवण्याचा निर्णय घेतला. परदेशात टिकून राहणे हे सोपे काम नसले, तरी मिळालेल्या संधीचा सदुपयोग करण्याचे त्यांनी ठरवले होते.

आठवडाभरात पाच पार्ट टाईम नोकरी करण्यासोबतच, त्याचा अंतिम प्रबंध तयार करण्यासाठी, नव्याने सादर करण्यात आलेली व्हिसा शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी, पदवीधर उद्योजक व्हिसा मिळवण्यासाठी प्रतीकने कठोर परिश्रम घेतले, जे यूकेमधील केवळ १ हजार विद्यार्थ्यांना एका अनोख्या व्यवसाय योजनेसह दिले जाणार होते. प्रतीक यांची ही मेहनत फळाला आली आणि २०१४ मध्ये 'इंडियन मुव्ही फ्रेंड' (IMF) नावाच्या त्याच्या पहिल्या व्यावसायिक उपक्रमाचा जन्म झाला.

व्हिसा नियमांच्या चुकीच्या माहितीमुळे पदवीनंतर, प्रतीक यांना व्हिसाची मुदतवाढ मंजूर होईपर्यंत डिसेंबर २०१३ ते मे २०१४ दरम्यान पाच महिन्यांच्या कालावधीसाठी भारतात परतावे लागले. इथे आल्यावर त्यांना घरच्यांच्या दबावाला सामोरे जावे लागले. युकेला परत जाण्यापेक्षा इथेच एखादी चांगली नोकरी सुरु करावी, अशी घरच्यांची इच्छा होती. मात्र वडिलांच्या इच्छेविरुद्ध 'इंडियन मुव्ही फ्रेंड' सुरु करण्यासाठी केवळ १५ लाख रुपये घेऊन प्रतीक पुन्हा युकेला परतले.

एक पंचवीस वर्षांचा मुलगा, ज्यांना परदेशी भूमीत व्यवसाय चालवण्याचा कोणताही पूर्व अनुभव नसताना, जिथे कोणतेही संदर्भ किंवा मार्गदर्शन नसताना, अनेक आव्हानांचा सामना करत, केवळ प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी या सगळ्या अडथळ्यांवर मात करून 'इंडियन मुव्ही फ्रेंड'ची स्थापना केली. 'कट्यार काळजात घुसली', 'नटसम्राट' या सिनेमांचे वितरण असो की शरद पवार, दिलीप वेंगसरकर व संपूर्ण मराठी चित्रपटसृष्टीला सोबत घेऊन केलेला २०१६ चा 'गर्जा महाराष्ट्र माझा' हा लंडनमधील सर्वात मोठ्या ऑडिटोरियममधील कार्यक्रम, 'कपिल शर्मा शो', 'अरमान मलिक शो', 'राहत फत्ते अली खान' यांच्या शोमधील सहभाग व सध्याचे कॉमेडियन स्टार्स अतुल खत्री, गौरव कपूर आणि आकाश गुप्ताचे शोज असो. भारतीय चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रात एक नाव कमावले. मोठ्या चिकाटीने त्यांनी रोजगार निर्मितीच्या आवश्यकता पूर्ण केल्या ज्यामुळे त्यांना पुढील सात वर्षांसाठी व्हिसा वाढवून मिळाला.

२०१६ मध्ये त्यांनी 'इंडियन मुव्ही फ्रेंड'ला तिकीट पोर्टलवरून मुव्ही स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर रूपांतरित करण्याचे ठरवले. व महेश मांजरेकरांच्या 'ध्यानीमनी' हा पहिला मराठी चित्रपट जो भारतात सिनेमागृहांमध्ये आणि भारताबाहेर इंडियन मुव्ही फ्रेंडद्वारा डिजिटली एकाच वेळी प्रदर्शित होणारा मराठी सिनेमा ठरला. मात्र हा प्रयत्न फसला. या निर्णयाने त्यांना दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर नेले. आधीच इतका संघर्ष सहन केल्यानंतर, या नवीन आघाताने प्रतीक पूर्णपणे कोलमडले आणि तो आत्महत्या करण्याचा पर्याय निवडला. हे पाऊल टाकत असताना त्यांना त्यांच्या आईच्या आवाजाने धैर्याची आठवण करून दिली.

काही या अनुभवतातून नैराश्येच्या गर्तेत जातात तर काही या सगळ्यावर मात करत, निर्भयपणे पुढे जातात. एखाद्या फिनिक्स पक्ष्याने राखेतून भरारी घ्यावी, अशी ते भरारी घेतात. अशीच भरारी घेतली. त्यांनी पुन्हा एकदा सर्व अडचणींविरुद्ध लढण्याचे ठरवले आणि २०१८ मध्ये नवीन उपक्रम 'गोविडो' जन्माला आला. मुख्य धारेतील हॉलिवूड आणि ब्रिटिश सिनेमा चित्रपटांसाठी एक गुंतवणूक व्यासपीठ. २०२२ पर्यंत गोविडो प्लॅटफॉर्म वरून ऑस्कर, बाफ्टा अशा नामांकित पुरस्कार प्राप्त निर्मात्यांच्या १२ सिनेमांमध्ये तब्बल १५ करोड रुपयांची गुंतवणूक गेलेली आहे.

त्यांनी 'इंडियन मुव्ही फ्रेंड'चे पुनरुज्जीवन केले आहे आणि फ्रान्समधील जगप्रसिद्ध कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये २०२२ ला आमंत्रण मिळाले, जिथे त्याने आपले येणारे उपक्रम जगासमोर मांडले. प्रतीक यांच्या जिद्दीची कहाणी असलेला 'द आंत्रप्रेन्युअर' हा माहितीपट गोविडो युट्यूबवर उपलब्ध असून लवकरच तो मुख्य प्रवाहातील हॉलिवूड सिनेमा बनत आहे.

आपण प्रतीक शेलार अथवा The Entrepreneur - A Documentary यूट्यूब वर सर्च करून हा माहितीपट पाहू शकता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhayandar News : सोसायटीचं फायर टेंडर दिलं नाही म्हणून उग्निशमनच्या अधिकाऱ्यांने केली बेदम मारहाण, खजिनदार गंभीर जखमी

Maharashtra Politics: निवडणूक रोखे योजनेत मोठा भ्रष्टाचार, भाजपकडून त्याच पैशाचा पश्‍चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वापर: पृथ्वीराज चव्हाण

BSP National Coordinator : मायावतींनी आकाश आनंद यांना नॅशनल कॉर्डिनेटरपदावरून हटवलं, आता जबाबदारी कोणावर?

Ratnagiri Sindhudurg: किरण सामंत दिवसभर नॉट रिचेबल, अखेरच्या काही मिनिटांत मतदानासाठी अवतरले; नारायण राणेंना बसणार फटका?

Maharashtra Politics 2024 : बारामतीत सुप्रिया सुळेंची 'मोहब्बत की दुकान'; सुप्रिया सुळे थेट अजित पवारांच्या घरी

SCROLL FOR NEXT