The Accidental Cockroach Party Movie saam tv
मनोरंजन बातम्या

The Accidental Cockroach Party Movie: 'कॉकरोच' आंदोलनाची कहाणी आता मोठ्या पडद्यावर; अभिजीत दिपकेंची भूमिका कोण साकारणार?

The Accidental Cockroach Party Movie: दिल्लीतील CJP आंदोलनावर आधारित 'द ॲक्सिडेंटल कॉकरोच पार्टी' चित्रपटाची घोषणा झाली आहे. राजकीय व्यंग आणि वास्तवावर आधारित हा सिनेमा 2027 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

Shruti Vilas Kadam

The Accidental Cockroach Party Movie: दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) च्या आंदोलनाने देशभरात मोठी चर्चा रंगवली होती. नीट (NEET) पेपरफुटीच्या मुद्द्यावर झालेल्या या आंदोलनाने सोशल मीडियासह राजकीय वर्तुळातही लक्ष वेधून घेतले. आता हीच घटना रुपेरी पडद्यावर झळकणार असून, 'द ॲक्सिडेंटल कॉकरोच पार्टी' (The Accidental Cockroach Party) या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

चित्रपटाच्या नावामुळेच सध्या मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अनेकांनी या टायटलमुळे आश्चर्य व्यक्त केले असले, तरी निर्मात्यांच्या मते हा सिनेमा केवळ राजकीय व्यंगचित्र नसून आंदोलनामागील घडामोडी, त्याची पार्श्वभूमी आणि त्या काळातील सामाजिक-राजकीय वातावरण प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे.

या चित्रपटात आंदोलनाची सुरुवात कशी झाली, त्यामागील नियोजन, पडद्यामागे घडलेल्या घटना आणि काही निर्णयांमागील राजकीय समीकरणे सिनेमॅटिक शैलीत दाखवली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हा सिनेमा केवळ घोषणाबाजी किंवा राजकीय भाष्यापुरता मर्यादित न राहता, व्यंग, वास्तव आणि राजकीय नाट्य यांचा संगम ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या चित्रपटाची संकल्पना आणि पटकथा जयपूरचे संशोधक व लेखक गोविंद देव ब्रह्म यांनी तयार केली आहे. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, दरम्यान, 'द ॲक्सिडेंटल कॉकरोच पार्टी' या चित्रपटाच्या प्री-प्रॉडक्शनचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती समोर आली आहे. तरी अद्याप कोणत्याही कलाकाराच्या किंवा दिग्दर्शकाच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. हा चित्रपट 2027 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

GEN Z वरून कंगना-रामदेवबाबा यांच्यात जुंपली, बाबांनी काढले कंगनाचे कारनामे

पुणं बनतंय बाबाबुवा नगरी, 23 वर्षांच्या मोटीव्हेशनल बाबाच्या जाळ्यात तरुणी

पंतप्रधानांच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध सुरू, काँग्रेस कमिटीच्या बैठकीत राहुल गांधीचा मोठा दावा

होमवर्क केला नाही म्हणून शिक्षिकेनं मारली चापट; सहा वर्षांच्या चिमुकल्याचा वर्गातच मृत्यू, VIDEO व्हायरल

आता लाडक्या मुलींना 2 हजार मिळणार, GEN Z तरुणींना आता पॉकेट मनी

SCROLL FOR NEXT