Tharala Tar Mag saam tv
मनोरंजन बातम्या

Tharala Tar Mag : अर्जुन-सायलीसमोर आलं नागराजचं सत्य; मालिका घेणार 'हे' धक्कादायक वळण, सुमन काकूचं काय होणार? पाहा VIDEO

Tharala Tar Mag Marathi Serial Update : 'ठरलं तर मग' मालिकेला धक्कादायक वळण आले आहे. नागराजचे सत्य लवकरच अर्जुन-सायली समोर येणार आहे. सुमन काकूचे पुढे काय होणार? जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'ठरलं तर मग'मध्ये मकर संक्रांत विशेष भाग पाहायला मिळणार आहे.

मालिकेत सर्वजण सुमन काकूचा शोध घेताना दिसत आहे.

अर्जुन-सायलीला नागराजचे खरं सत्य समजणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' सध्या महत्त्वाच्या टप्प्यावर पाहायला मिळत आहे. नुकतेच महिपत शिखरेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे आता किल्लेदार आणि सुभेदार कुटुंब सुमन काकूला शोधताना पाहायला मिळत आहे. पण सुमन काकूला नाजराजने किडनॅप केले आहे. आता अर्जुन महिपतकडून जाणून घेत आहे की, 22 वर्षांपूर्वी प्रतिमा आणि रविराज किल्लेदार यांचा अपघात कोणी घडवून आणला.

सध्या मालिकेत अर्जुन-सायलीची मकर संक्रांत पाहायला मिळत आहे. दोघेही खूप छान नटले आहेत. अशात अर्जुन-सायली समोर नाजराजचे सत्य येणार आहे. मालिकेचा खास प्रोमो समोर आली आहे. अर्जुन-सायलीच्या मकर संक्रांत स्पेशल कार्यक्रमात स्टार प्रवाहवरील मालिकेच्या नायिका येतात. 'शुभविवाह' मालिकेतील भूमी, 'लपंडाव'मधील सखी, 'साधी माणसं'मधील मीरा आणि 'लग्नानंतर होईलच प्रेम'मधील काव्या येते. या चौघी मिळून नागराजचे सत्य समोर आणणार आहे.

नागराजच्या मोबाईलमध्ये सखी, मीरा, काव्या आणि भूमी सुमन काकूचा व्हिडीओ पाहतात. ज्यात सुमन काकूला बांधून ठेवलेले दिसत आहे. नागराजनेच सूमन काकूला किडनॅप केले असल्याचे सत्य या चौघी अर्जुन-सायलीला सांगताना दिसत आहेत. जे ऐकून अर्जुन-सायलीला मोठा धक्का बसतो.

'ठरलं तर मग' मालिकेचा विशेष भाग 18 आणि 19 जानेवारीला रात्री 8.30 वाजता पाहायला मिळणार आहे. 'ठरलं तर मग' मालिकेत अर्जुन सायली सुमनचा शोध कसा घेणार? अर्जुन-सायली समोर नागराजचे सत्य आल्यावर किल्लेदार आणि अर्जुन नागराजला कोणती शिक्षा देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे मालिकेचे पुढचे भाग अधिक रंजक असतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Elections Result Live Update : नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं खातं उघडलं, एकाच प्रभागातील ४ उमेदवार विजयी

Municipal Elections Result: पुण्यात मतमोजणी केंद्रावर गोंधळ, EVM मशीन बदलल्याचा ठोंबरेंचा आरोप, पोलिसांसोबत अरेरावी

Pune Mahanagar Palika Nivadnuk nikal : पुण्याचा दादा कोण? पहिला निकाल आला हाती, ३ जागांवर एकाच पार्टीचा विजय, भाजपचा पराभव

Neer Dosa Recipe : नाश्त्याला बनवा कुरकुरीत तांदूळ अन् ओले खोबरे घालून नीर डोसा, नोट करा रेसिपी

केंद्रीय मंत्र्यांचा निकटवर्तीय विजयाच्या उंबरठ्यावर, कुख्यात गुंड असलेल्या उमेदवारानं जेलमधून लढवली निवडणूक|VIDEO

SCROLL FOR NEXT