Marathi Serial Update SAAM TV
मनोरंजन बातम्या

Marathi Serial Update : ठरलं तर मग! आवडत्या मालिका करणार तुमचं डबल मनोरंजन, बदलली वेळ आताच नोट करा

Tharala Tar Mag-Gharoghari Matichya Chuli New Timing : प्रेक्षकांच्या आवडत्या 'मालिका ठरलं तर मग' आणि 'घरोघरी मातीच्या चुली' यांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आला आहे. तसेच या मालिका आता प्रेक्षकांचे डबल मनोरंजन करणार आहेत.

Shreya Maskar

मालिका हा प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. प्रत्येक दिवशी मालिकांमध्ये येणारे वळण जाणून घेण्यास प्रेक्षक आतुर असतात. कलाकार देखील प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करतात. मालिकांमध्ये थोड्या थोड्या वेळानंतर एक नवा ट्विस्ट पाहायला मिळतो. 'स्टार प्रवाह' वरील 'घरोघरी मातीच्या चुली' आणि 'ठरलं तर मग' या दोन मालिका प्रेक्षकांचे बंपर मनोरंजन करत आहेत.

'ठरलं तर मग' (Tharala Tar Mag) मालिकेत लगीनघाई पाहायला मिळत आहे. तर 'घरोघरी मातीच्या चुली' (Gharoghari Matichya Chuli ) या मालिकेत विकी कौशल पाहायला मिळणार आहे. 'घरोघरी मातीच्या चुली' आणि 'ठरलं तर मग' या दोन्ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या आहेत. मात्र आता या मालिकांबद्दल नवीन अपडेट समोर आली आहे. या मालिकांचे वेळ बदलण्यात आले आहे. १० फेब्रुवारीपासून मालिकांच्या वेळेत बदल पाहायला मिळणार आहे.

'स्टार प्रवाह'च्या अधिकृत इन्स्टाग्राम पोस्टवरून मालिकांचे नवे वेळापत्रक नोट करून घ्या. १० फेब्रुवारीपासून 'ठरलं तर मग' ही मालिका संध्याकाळी 8.15 ते 9.00 या वेळेत पाहता येणार आहे. ही मालिका कायमच टीआरपीच्या शर्यतीत पुढे राहिली आहे. प्रेक्षकांसाठी ही पाऊण तासची मेजवानी होणार आहे. तर दुसरीकडे 'घरोघरी मातीच्या चुली' मालिकेची वेळ संध्याकाळी 7.30 ते 8.15 अशी झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : तेरा वर्षांच्या मुलीची हत्या करणाऱ्याचा एन्काऊंटर करा; तृप्ती देसाईंची संतप्त मागणी

Kaas Pathar : फुलांनी बहरलेले नंदनवन, 'कास पठार 'चं सौंदर्य पर्यटकांना खुणावते

Karisma Kapoor: दिवाळी स्पेशल करिश्मा कपूरच्या बोल्ड साडी लूक पाहून चाहाते घायाळ, PHOTO व्हायरल

Dhanashree Kadgaonkar Photos: मन तळ्यात मळ्यात.. जाईच्या कळ्यात, टिव्हीच्या वहिनीसाहेबाचं सौंदर्य खुललं

ट्रेकिंग करताना पक्षाघात, पण ८४ वर्षीय करवंदे काका हरले नाहीत; १७०६ वेळा सर केला सिंहगड किल्ला!

SCROLL FOR NEXT