Thalapathy Vijay Attended A Party With Trisha Krishnan Saam Tv
मनोरंजन बातम्या

Thalapathy Vijay: एकीकडे घटस्फोटाच्या चर्चा, दुसरीकडे थलापती विजय-त्रिशाची लग्नात एकत्र एन्ट्री, व्हिडिओ आला समोर

Thalapathy Vijay : दाक्षिणात्य स्टार थलापती विजय यांच्या पत्नी संगीताने त्यांच्यावर विश्वासघाताचा आरोप केला आहे. या आरोपांमध्ये विजयचे नाव अभिनेत्री त्रिशा कृष्णनसोबत जोडले जात होते आणि आता विजय स्वतः त्रिशासोबत एका पार्टीत सहभागी झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.

Shruti Vilas Kadam

Thalapathy Vijay Attended A Party With Trisha Krishnan: दक्षिणेतील सुपरस्टार थलापती विजय यांच्या पत्नी संगीताने चेन्नईमध्ये त्यांच्याविरुद्ध घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्याच्या काही दिवसांनी थलापती 'एजीएस'चे निर्माते कल्पती सुरेश यांच्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शनला उपस्थित राहिले. सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. पण या रिसेप्शनला थलापती अभिनेत्री त्रिशा कृष्णनसोबत आल्याचे दिसत आहे. हे फोटो विजयच्या घटस्फोटाच्या सुरू असलेल्या अफवांमध्ये समोर आल्याने सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

विजय आणि त्रिशा रिसेप्शनला एकत्र

विजय आणि त्रिशा एकत्र रिसेप्शनला पोहोचले. यावेळी विजयने फुलांचा गुच्छ धरला होता, तर त्रिशा पाहुण्यांना भेटत होती. विजय आणि त्रिशा नवविवाहित कपलला भेटण्यासाठी स्टेजवर एकत्र गेले. त्यांनी एकत्र फोटो काढले.

चाहते निराश

चेन्नईमध्ये झालेल्या कार्यक्रमासाठी विजय आणि त्रिशानेबेज रंगाचे कपडे घातले होते. विजयने बेज रंगाचा शर्ट आणि लूंगी नेसले होते, तर त्रिशाने लाल ब्लाउजसह बेज आणि सोनेरी रंगाची साडी नेसली होती.पण, हा व्हिडिओ पाहिल्यानंतर, विजयचे चाहते दु:खी झाले आणि विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत. एकाने लिहिले, "मला तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हते, तुम्ही माझ्या विश्वासाला तडा दिलात."

संगीताने विजयवर विश्वासघाताचा आरोप केला

एएनआय वृत्तसंस्थेनुसार, संगीताने विजयवर विश्वासघाताचा आरोप केल्यानंतर लगेचच हे दोघे एकत्र दिसले. संगीताने विजयचा एका महिला अभिनेत्याशी अवैध संबंध असल्याचा आरोप केला होता. संगीताने चेन्नईतील चेंगलपट्टू कुटुंब न्यायालयात विजयविरुद्ध घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे. संगीता तिच्या पतीपासून वेगळी राहत असल्याचे सांगितले जात आहे.

याचिकेचा एक भाग असा आहे की, "एप्रिल २०२१ मध्ये, याचिकाकर्त्याला (संगिता) असे आढळून आले की प्रतिवादी (विजय) एका अभिनेत्रीसोबत अवैध संबंधात होता. यामुळे तिला मोठा भावनिक आघात आणि मानसिक त्रास झाला." याचिकेत पुढे म्हटले आहे की, अभिनेता अभिनेत्रीसोबत उघडपणे संवाद साधत राहिला यामुळे संगीताचा विश्वासघात झाला.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT