Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya Box Office Collection Day 1 Saam Tv
मनोरंजन बातम्या

TBMAUJ 1st Day Collection: शाहिद- क्रितीची अनोखी लव्हस्टोरी प्रेक्षकांना भावली; कमाईत पहिल्याच दिवशी ‘फायटर’लाही टाकलं मागे

TBMAUJ Box Office Collection: दीपिका आणि हृतिकच्या 'फायटर'पेक्षा पहिल्याच दिवशी 'तेरी बातों मध्ये उलझा जिया'ने उत्तम कमाई केली आहे.

Chetan Bodke

Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya 1st Day Box Office Collection

सध्या बॉक्स ऑफिसवर अनेक वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट रिलीज झाले आहेत. सध्या बॉक्स ऑफिसवर तेजा सज्जाचा 'हनुमान' (Hanuman) तर दीपिका आणि हृतिकचा 'फायटर' (Fighter) असे दोन चित्रपट आहेत. या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असताना काल अर्थात ९ फेब्रुवारीला शाहिद आणि क्रितीचा (Shahid Kapoor And Kriti Senon) 'तेरी बातों मैं उल्झा जिया' (Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya) रिलीज झाला आहे. चित्रपटाला प्रदर्शनाआधीच उत्तम प्रतिसाद मिळाला होता. चला तर जाणून घेऊया शाहिद आणि क्रितीच्या 'तेरी बातों मैं उल्झा जिया'च्या पहिल्या दिवसाच्या कमाईबद्दल

(Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya 1st Day Box Office Collection)

Sacnilk च्या अहवालानुसार, 'तेरी बातों मध्ये उलझा जिया' ने पहिल्या दिवशी ६ कोटींची दमदार कमाई केली आहे. दीपिका आणि हृतिकच्या 'फायटर'पेक्षा पहिल्याच दिवशी 'तेरी बातों मध्ये उलझा जिया'ने उत्तम कमाई केली आहे. चित्रपटाची प्रदर्शनाआधी हजारो तिकिटांची विक्री झाली होती. पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपॉलसारख्या मल्टिप्लेक्समध्ये प्रदर्शनाआधीच चित्रपटाचे सर्वाधिक तिकिट विकले गेले आहेत. 'व्हॅलेंटाईन डे' (Valentine's Day) निमित्त माणूस आणि रोबोटच्या लव्हस्टोरीवर आधारित चित्रपटाचे कथानक आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटातील शाहिदचा आणि क्रितीचा एक रोमँटिक सीन हटवण्यात आला आहे. क्रितीने चित्रपटामध्ये एका रोबोटचे पात्र साकारले. शाहिद कपूर आणि क्रिती सेननची लव्हस्टोरी चित्रपटामध्ये दाखवली आहे. ॲक्शन, रोमान्स आणि कॉमेडीचा जबरदस्त तडका असलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन अमित जोशी आणि आराधना साहने केले आहे. या चित्रपटामध्ये शाहिद आणि क्रिती व्यतिरिक्त बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देखील असणार आहे. त्याच्यासोबत डिंपल कपाडिया आणि राकेश बेदी देखील या चित्रपटाचा एक भाग आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mysterious stories from Mahabharata: शत्रू असूनही दुर्योधनाने अर्जुनाला का दिले होते ३ पराक्रमी बाण?

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

Milk And Curd: दूध आणि दही एकत्र खाल्ले तर काय होते?

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

SCROLL FOR NEXT