terence stamp superman zod passes away at 87 due to old age Saam Tv
मनोरंजन बातम्या

Actor Passes Away: पडद्यावरचा व्हिलन काळाच्या आड, प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन, मनोरंजन विश्वावर शोककळा

Hollywood Actor Passes Away: हॉलिवूड अभिनेता टेरेन्स स्टॅम्प यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले आहे. टेरेन्स सुपरमॅन चित्रपटात जनरल झोडच्या भूमिकेसाठी ओळखले जात होते.

Shruti Vilas Kadam

Actor Passes Away: ब्रिटिश चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते टेरेन्स स्टॅम्प यांचे निधन झाले आहे. सहा दशकांच्या कारकिर्दीत या अभिनेत्याने अनेक संस्मरणीय पात्रांना पडद्यावर जिवंत केले. ८७ वर्षीय या अभिनेत्याचे रविवारी निधन झाले, ज्याची माहिती त्यांच्या कुटुंबाने सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिली आहे.

अभिनय क्षेत्रात पदार्पण आणि सुरुवातीचे यश

लंडनमध्ये जन्मलेल्या टेरेन्स स्टॅम्प यांनी १९६२ मध्ये 'बिली बड' या चित्रपटाने आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. या पहिल्या चित्रपटासाठी त्यांना ऑस्करसाठी नामांकन देखील मिळाले होते. या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुकही झाले.

जनरल जोडच्या व्यक्तिरेखेतून ओळख

जरी, स्टॅम्प यांनी अनेक गंभीर आणि भावनिक भूमिका साकारल्या असल्या तरी, त्यांना १९८० च्या 'सुपरमॅन II' मधील जनरल जोडच्या व्यक्तिरेखेतून सर्वाधिक लोकप्रियता मिळाली. टेरेन्स स्टॅम्प यांच्या सर्वाधिक कौतुकास्पद भूमिकांमध्ये १९९४ च्या 'द अ‍ॅडव्हेंचर ऑफ प्रिस्किला, क्वीन ऑफ द डेझर्ट' या होत्या.

स्टीवन सोडरबर्ग यांच्या १९९९ च्या 'द लाइमी' चित्रपटातील त्यांच्या भूमिकेचे विशेष कौतुक करण्यात आले होते. या चित्रपटात त्यांनी सूडाने भरलेल्या एका वडिलांची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका गुन्हेगारी जॉनरच्या जगभरतील उत्तम चित्रपटांमध्ये गणली जाते. टेरेन्स स्टॅम्प यांनी केवळ चित्रपटांमध्येच काम केले नाही तर थिएटर आणि टेलिव्हिजनमध्येही सक्रिय होते. त्यांचा आवाज, पडद्यावरची उपस्थिती कौतुकास्पद होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

SCROLL FOR NEXT