Ram Charan and Upasana Image  Saam Tv
मनोरंजन बातम्या

लग्नाला दहा वर्षे झाली, सुपरस्टार राम चरणची पत्नी आई होण्यास तयार नाही, जाणून घ्या काय आहे कारण

साउथचा सुपरस्टार राम चरण हा केवळ दक्षिण भारतातच नाही तर संपूर्ण देशभरात आपल्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहे.संपूर्ण भारतात त्याचे लाखो चाहते आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : साउथचा सुपरस्टार राम चरण (Ram Charan) हा केवळ दक्षिण भारतातच नाही तर संपूर्ण देशभरात आपल्या अभिनयासाठी प्रसिद्ध आहे.संपूर्ण भारतात त्याचे लाखो चाहते आहेत. जे त्याला नेहमी फॉलो करत असतात. 'आर आर आर' (RRR) फेम राम चरणची पत्नी उपासना कामिनेनी सध्या तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. राम चरण आणि उपासनेच्या लग्नाला दहा वर्षे झाली. पण, मला मुलं नको असल्याचे उपासना एका मुलाखतीत म्हणली होती. त्याचबरोबर तिने तिच्या वैयक्तिक आयुष्यात कोणताही निर्णय घेतला असेल, तर सर्वांनी त्याचा आदर केला पाहिजे असंही ती म्हणाली आहे. अभिनेता राम चरणने २०१२ साली उपासना कामिनेनीसोबत लग्न केले होते.

बेबी प्लॅनिंगबाबत बऱ्याच मुलाखतींमध्ये राम चरणला अनेकदा प्रश्न विचारण्यात आले आहेत. इतकेच नाही तर, अनेकवेळा हे प्रश्न उपासनालाही विचारण्यात आले. दरम्यान, राम चरणची पत्नी उपासना कामिनेनीने सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या १७ व्या एटीए संमेलनात मुलं नको असल्याचे स्पष्ट कारण सांगितले आहे. उपासनाने सांगितले लग्नाच्या १० वर्षानंतरही तिला आई व्हायचं नाहीय,कारण तिला देशाच्या वाढत्या लोकसंखेची काळजी आहे.

याशिवाय, उपासनाने तिच्या सासुची सद्गुरूंशी भेट घालून दिली. सद्गुरींनी तिच्या सासूला भेटून तिला आणि राम चरणला मुलं नको असल्याच्या निर्णयाबद्दल समजावून सांगितले.उपासना पुढे म्हणाली, लोकांना कार्बन फूटप्रिंटची चिंता वाटते, पण जर ही फूटप्रिंटची संख्या कमी झाली तर तुम्हाला ग्लोबल वॉर्मिंगची चिंता करावी लागणार नाही. म्हणूनच ज्या स्त्रियांनी मुलं जन्माला न घालण्याचा निर्णय घेतला आहे, मला त्यांचा खूप अभिमान आहे.

अभिनेता राम चरणही त्याच्या बऱ्याच मुलाखतीत त्याला मुलं नको असल्याचे बोलला आहे. कारण सिनेमांवरच त्याचं पाहिलं प्रेम आहे. 'सुपरस्टार चिरंजीवीचा मुलगा असल्यामुळे मला चाहत्यांना खुश ठेवणं गरजेचं आहे. परिवार वाढवल्याने माझं माझ्या ध्येयापासून लक्ष विचलित होईल. उपासनाच्या आयुष्यातही काही ध्येय आहेत आणि तिला ते पूर्ण करायचे आहेत. म्हणूनच आम्ही दोघांनी मुलं न करण्याचा निर्णय घेतला आहे'. असे राम चरणने त्याच्या एका मुलाखतीत सांगितले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fruit Juice For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण फळांचा ज्यूस पिऊ शकतात का? जाणून घ्या

Maharashtra News Live Update: आमदार नारायण पाटील भाजपच्या मेळाव्यात

केसांचे आरोग्य सुधारायचे आहे? रोजच्या आहारात आजच समाविष्ट करा 'या' ५ शक्तीशाली बिया

Kalyan : धक्का लागल्यानं डोकं सटकलं, चालकावर धारदार शस्त्रानं हल्ला; कल्याणमध्ये रक्तरंजित थरार!

Dussehra Horoscope: दसऱ्याला 3 राशींचं नशीब चमकणार! अडकलेली कामं पूर्ण होण्याचे संकेत, पैशाच्या समस्या दूर होणार

SCROLL FOR NEXT