Aai Kuthe Kay Karte Serial Update  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Aai Kuthe Kay Karte Serial Update: अनिरूद्धचं भांडं फुटलं, नितीनने सांगितला आशुतोष- अरूंधतीला सगळं प्रकरण...

Aai Kuthe Kay Karte Daily Update: ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या पुढील भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात.

Chetan Bodke

Aai Kuthe Kay Karte Latest Promo: ‘आई कुठे काय करते’ या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे. मालिकेच्या कथेतही दिवसेंदिवस नवा ट्वीस्ट प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे. वीणाच्या येण्याने अनिरुद्ध संजनाशी अजूनच विचित्र वागू लागला आहे. तर वीणाला अनिरुद्धचे वागणे योग्य वाटत आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या पुढील भागात काय होणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असतात. नुकताच या मालिकेचा एक प्रोमो प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमध्ये अरुंधती सह अनेक पात्र दिसत आहेत. चला तर मग जाणून घेऊया आजच्या प्रोमोबद्दल...

आजच्या भागात अरूंधती भावूक झाली. कारण आशुतोष अनिरूद्धच्या वडीलांसोबत अर्थात तिच्या पुर्वाश्रमीच्या सासऱ्यांसोबत तो खूप चांगला वागतो. त्यांची सर्वच उठबस तो करत असतो. अप्पा अरूंधतीसाठी वडीलांप्रमाणे असून ते दोघेही त्यांना वडिलांचेच स्थान देतात. हे पाहून अरूंधती आशुतोषला म्हणते, कोणीही हे काम करू शकत नाही, पण तुम्ही ते काम केलंत. त्यांचा मुलगा अनिरूद्ध देखील त्यांच्यासोबत तुझ्यासारखा वागत नाही. अरूंधतीची आई डोंबवलीला राहते. त्यांना डोंबिवलीहून यायला त्रास होतो याची खंत आजही तिच्या मनात आहे.यावेळी आशुतोष अरूंधतीला आश्वासन देतो की, तुझ्यासाठी तुला काय करायचे आहे, ते करू शकते.

तेवढ्यात नितिनची एन्ट्री होते. नितिनने अनिरूद्धचं भांडं फोडलं. अनिरूद्ध वीणाला फसवत असल्याची माहिती नितीन अरूंधती आणि आशुतोषला सांगते. अनिरूद्ध वीणाच्या कंपनीतील पोझिशनचा फायदा घेतो. अनिरूद्धने वीणाला फसवून तब्बल ५० लाखांची तो चोरी करतो. अनिरूद्धने वीणाच्या नकळत कंपनी अकाऊंटमधून ५० लाख काढल्याचा आरोप करतो.

तर दुसरीकडे वीणा आणि अनिरुद्ध ऑफिसच्या कामानिमित्त एकमेकांसोबतच असतात. ऑफिससाठी ते जी नवीन जागा बघताय त्याचे डाऊन पेमेंट करण्यासाठी त्याने कंपनीतून ५० लाख रुपये काढल्याचे वीणाला सांगतो. आणि अनिरूद्धने वीणाला न सांगता ते पैसे काढल्याने तिची माफीही मागतो. त्यावेळी वीणाने त्याला माफ केले. लगेचच तो भावूक होऊन तिची माफी मागतो.

‘हल्ली माझ्या घरातलेही माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत, तू विश्वास दाखवल्याबद्दल थँक्यू.’ असं म्हणत तो तिची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतो. मिळवलेला विश्वास कधीच तोडणार नाही. असा त्याने यावेळी विश्वास दिला.

तर आणखी एक महत्वाची बाब म्हणजे, आशुतोषला ‘बिझनेसमन ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने देशमुखांच्या घरी आनंदाचा दिवस आहे. तेवढ्यात अनिरूद्ध येऊन त्याला कपटी भावाने शुभेच्छा देतो. अनिरूद्धच्या मते तो स्वत: अवॉर्डवर विश्वास नाही, पण यंदाचा पुरस्कार योग्य व्यक्तीला मिळाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूरात ऊस दरासाठी असलेल्या आंदोलनात पोलिसांकडून आंदोलकांना धक्काबुक्की

Methi Thepla Recipe : नाश्त्यासाठी बनवा गुजरात स्पेशल मेथी थेपला, झटपट तयार होते रेसिपी

मुंबईत अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; आता राजकीय दबावाचा नवा वाद, नेमकं काय घडलं?

Success Story: लहानपणी आईवडिलांचे छत्र हरपलं, आजीने मोठं केलं, सलग ५ वेळा अपयश, ६व्या प्रयत्नात IPS; अंशिका जैन यांचा प्रवास

Oldest Forts In India: भारतातील सगळ्यात जूने किल्ले कोणते? जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT