Tharla Tar Mag Gokulashtami Special Episode Instagram
मनोरंजन बातम्या

Tharla Tar Mag Special Episode: ‘ठरलं तर मग’ मध्ये रंगला दहीहंडीचा उत्साह, सायली आणि अर्जुनने एकत्र फोडली दहीहंडी

Tharla Tar Mag Gokulashtami Special Episode: सायली- अर्जुन एकत्र दहीहंडी फोडणार आहे.

Chetan Bodke

Tharla Tar Mag Dahi Handi 2023 Special Episode

सध्या ‘ठरलं तर मग’ मालिकेमुळे आणि तिच्या खासगी आयुष्यामुळे अभिनेत्री जुई गडकरी सध्या प्रचंड चर्चेत आहे. सध्या ही मालिका टीआरपीमध्ये अव्वल असून या मालिकेच्या प्रसिद्धीचा आलेख चढताच आहे. मालिकेतील घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक कायमच उत्सुक असतात. मालिकेची कथा सध्या रंजक वळणावर आहे. सोशल मीडियावर दहीहंडीच्या स्पेशल एपिसोडची प्रचंड चर्चा सुरू आहे. या एपिसोडमध्ये सायली- अर्जुन एकत्र दहीहंडी फोडणार आहे.

अनेक मालिकांमध्ये दहीहंडीचा उत्साह आपल्याला पाहायला मिळत आहे. या दहीहंडीच्या सणाची क्रेझ स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेतही दिसून येत आहे. दहीहंडीच्या एपिसोडमध्ये, अर्जुन त्याच्या मित्रांसोबत दहीहंडी फोडण्याची तयारी करत असतो. तितक्यात घरातून सायली फुल्ल रॉकिंग अंदाजामध्ये येताना दिसत आहे. कंबरेला ओढणी बांधून तिने पटापट थर सर करून दहीहंडी फोडते. ही दहीहंडी सायली आणि अर्जुनने एकत्र फोडली आहे. प्रेक्षकांना मालिकेतील दहीहंडीचा उत्साह आजचा एपिसोडमध्ये पाहता येणार आहे. (Serial)

मालिकेमध्ये सायलीने अर्थात जुई गडकरीने एकाच शॉर्टमध्ये दहीहंडी फोडल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितलंय. सध्या जुई गडकरीची दहीहंडी विशेष मुलाखत प्रचंड चर्चेत आहे. मुलाखतीत जुई म्हणते, “मला दहीहंडी पाहायला खूप आवडते. मला माझे आजोबा आणि काका कर्जतमधल्या सर्व दहीहंडी पाहायला घेऊन जायचे. पण मी या मालिकेत पहिल्यांदाच दहीहंडी फोडली आहे. ज्यावेळी गोविंदा हंडी फोडण्यासाठी एकावर एक थर लावत चढतात, ते पाहून मला खूप भिती वाटते. मी तो दहीहंडीचा सीन करताना, देवाकडे प्रार्थना करत होते. शुटिंगसाठी आलेल्या गोविंदा पथकाने मला खूर मदत केली. त्यांनी मला शुटिंगच्या वेळी मला खूप पाठिंबा दिला.” (Marathi Film)

पुढे जुई मुलाखतीत म्हणाली, “मी शुटिंगच्या आधी सकाळी म्हणाले होते की, मला फक्त सरावाची आहे, मी त्यातल्या टेक्निकल गोष्टी शिकली आणि मला कशा पद्धतीने चढता येईल, हे जाणून घेतलं. हा सीन माझ्यासाठी फार कठीण होता. त्यामुळे मी देवावर आणि गोविंदांवर सोडून दिलं होतं. म्हणून तो पहिल्याच टेकमध्ये शॉट झाला.” (Television Serial)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gopichand Padalkar : कंडोम, साड्या, तलवारी... गोपीचंद पडळकरांच्या कार्यकर्त्याचे अपहरण करणाऱ्यांकडे काय-काय सापडलं?

Maharashtra Live News Update: - वरळी कोळीवाड्यात शिंदे-ठाकरे आमनेसामने

Central Government: एलपीजी, शिक्षण आणि पायाभूत सुविधा; मंत्रिमंडळ बैठकीत केंद्र सरकारचे पाच मोठे निर्णय

Pune Crime News: पुण्यात दहशत; हातात धारदार कोयते, गलिच्छ शिव्या देत टोळक्यांचा धुडगूस|VIDEO

Health Tips: महिलांना दररोज किती तासांची झोप असते आवश्यक? महिला पुरुषांपेक्षा जास्त वेळ झोपतात?

SCROLL FOR NEXT