Prajakta Mali Birthday Celebration At Karjat In MHJ Team Instagram
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali Birthday Celebration: प्राजक्ता माळीच्या वाढदिवसाचे MHJ च्या टीमने केलं जंगी सेलिब्रेशन; धम्माल करतानाचा व्हिडीओ केला शेअर

Prajakta Mali Birthday Celebration At Karjat: शो सुरू होण्याआधीच मालिकेतील कलाकारांनी वॅकेशनचा आनंद लुटताना दिसले.

Chetan Bodke

Prajakta Mali Birthday Celebration At Karjat In MHJ Team: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या टेलिव्हिजन शोची कायमच सोशल मीडियावर चर्चा होते. अवघ्या काही दिवसातच या शोला प्रेक्षकांकडून लोकप्रियता मिळाली. दोन महिन्यांपूर्वी या शोने ब्रेक घेतला होता, आता पुन्हा एकदा हा शो नव्याने सुरू होणार आहे. येत्या १४ ऑगस्टपासून १४ ऑगस्टपासून रात्री ९ वाजता सोनी मराठी वाहिनीवर पुन्हा नव्याने सुरु होणार आहे. लवकरच हा शो सुरू होणार असून त्याआधी मालिकेतील कलाकार वॅकेशनचा आनंद लुटताना दिसले.

मालिकेतील सर्व कलाकार एकत्र येत त्यांनी प्राजक्ता माळीचा वाढदिवस साजरा केला. हा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांनी प्राजक्ता माळीच्या कर्जत येथील ‘प्राजक्तकुंज’ या फार्महाऊसवर सेलिब्रेशनसाठी गेले होते.

प्राजक्ता माळीचा ८ ऑगस्ट रोजी वाढदिवस झाला. तिच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन त्यांनी तिच्या घरी देखील केलं आणि तिच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन त्यांनी तिच्या फार्महाऊसवर देखील केलं. एक आनंदाचा क्षण म्हणून कर्जतच्या फार्महाऊसवर प्राजक्ता माळीने मालिकेतील संपूर्ण टीमबरोबर वाढदिवस साजरा केला.

सध्या त्यांचे सेलिब्रेशनचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्राजक्ता माळी कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. अभिनेत्रीने नुकतंच सोशल मीडियावर फार्महाऊसवरील धम्माल मस्ती करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडीओत हास्यजत्रेची संपूर्ण टीम सुट्ट्यांचा आनंद लुटताना दिसत आहे. सोबतच व्हिडीओमध्ये प्राजक्ता माळीच्या फार्महाऊसची देखील झलक पाहायला मिळते.

शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये अरुण कदम, प्रियदर्शनी इंदलकर, वनिता खरात, सचिन गोस्वामी, समीर चौघुले, रसिका वेंगुर्लेकर, नम्रता संभेराव, प्रसाद खांडेकर, शिवाली परब, सचिन मोटे, ओंकार राऊत अशी संपूर्ण हास्यजत्रेची टीम प्राजक्ताच्या कर्जत येथील फार्महाऊसवर धम्माल मस्ती करण्यासाठी गेली आहे. व्हिडीओ शेअर करताना प्राजक्ताने कॅप्शन दिले की, “प्रत्येक रविवार असाच असला पाहिजे” सध्या अभिनेत्रीच्या या पोस्टची सोशल मीडियावर बरीच चर्चा होते. प्राजक्ताने शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT