Akshaya Naik New Theater Saam Tv
मनोरंजन बातम्या

Akshaya Naik New Theater: ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अक्षया नाईकची रंगभूमीवर एन्ट्री, नवीन नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Akshaya Naik News: सोशल मीडियावर अक्षया नाईकचा नाटकातील पहिला लूक समोर आला आहे.

Chetan Bodke

Akshaya Naik New Theater

‘सुंदरा मनामध्ये भरली’फेम अक्षया नाईकने फार अल्पावधीतच टेलिव्हिजनससृष्टीत लोकप्रियता मिळवली आहे. त्या मालिकेच्या माध्यमातून तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. छोट्या पडद्यावरुन अक्षया आता रंगभूमीवर पदार्पण करणार आहे, अर्थात नाटकसृष्टीत ती पदार्पण करणार आहे. भूमिका थिएटर्स आणि वाईड अँगल एन्टरटेन्मेंट यांनी एकत्रित नाटकाची निर्मित केली आहे. नुकताच सोशल मीडियावर अक्षया नाईकचा नाटकातील पहिला लूक समोर आला आहे.

अभिनेत्रीचा हा नवा लूक नुकताच शेअर करण्यात आला असून अल्पावधीतच तिच्या लूकची चर्चा होत आहे. अभिनेत्रीचा नाटकातील हा नवा लूक ‘राजश्री एंटरटेन्मेंट’च्या सोशल मीडिया पेजवर शेअर करण्यात आला आहे. अक्षयाचा या नाटकामध्ये एका वृद्ध महिलेचा लूक साकारला आहे, जी आपल्या पतीला मॉर्निंग वॉकला जायला उशीर होतोय, असं म्हणताना दिसते. ती पुढे म्हणते, “अहो किती उशीर?, नेहमी तुमच्याचमुळे उशीर होतो आपल्याला, आपल्याला वॉकला जायचंय, लग्नाला नाही. माझं झालाय आवरुन, चला लवकर.” असं वाक्य ती बोलताना दिसतेय.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी लिहिलेलं नाटक काही वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलं होतं. या नाटकाचं प्रेक्षकांकडून चांगल्या प्रमाणात कौतुकही झालं होतं. प्रभावळकर यांच्या दर्जेदार लेखणीतून साकारलेल्या या नाटकाला साधारणतः आता पंचवीस वर्षे होऊन गेली आहेत. मात्र हलकेफुलके असलेले हे नाटक आजही तितकेच ताजेतवाने आहे. नाटकाचे संगीतकार सुप्रसिद्ध ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की आहेत.

अक्षया नाईक "सुंदरा मनामध्ये भरली" या मालिकेतून घराघरात पोहोचली. पहिल्याच मालिकेत आव्हानात्मक भूमिका असल्याने अभिनेत्रीने आपला अभिनय क्षमता दाखवून दिली. त्यामुळे अक्षया सशक्त अभिनेत्री असल्याचं स्पष्ट झालं. या नाटकातील तिच्या भूमिकेबद्दल तिला विचारले असता तिने अजुन थोडी प्रतीक्षा करावी असे सांगितले. अक्षयाबरोबर नाटकात आणखी कोण कलाकार आहेत?, हे नाटक रंगभूमीवर कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार? याचे उत्तर अद्याप गुलदस्त्यात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT