Bigg Boss 18  SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18 : 'बिग बॉस १८' चा सर्वात महागडा स्पर्धक कोण? 'या' टीव्ही अभिनेत्याच्या नावची चर्चा

Mohsin Khan : सध्या सर्वत्र बिग बॉसची चर्चा पाहायला मिळत आहे. सलमान खानचा बिग बॉस 18 लवकरच सुरू होणार आहे. अनेक टीव्ही कलाकार तुम्हाला येथे पाहायला मिळतील.

Shreya Maskar

इंडस्ट्रीतील अनेक कलाकार सलमान खानच्या 'बिग बॉस' (Bigg Boss) शो मध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक असतात. याच कारणामुळे अनेक सेलिब्रिटींनी अनिल कपूरच्या बिग बॉस ओटीटीची ऑफर नाकारली आहे आणि सलमान खानच्या (Salman Khan) शोची वाट पाहत आहेत. पण बिग बॉसचे निर्माते नेहमी सेलिब्रिटींना शोमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क साधतात, ज्यांनी त्यांचा अनेकदा ऑफर नाकारल्या आहेत. आता निर्मात्यांनी बिग बॉससाठी कार्तिक म्हणजेच 'ये रिश्ता क्या कहलाता है' मधील मोहसिन खानशी संपर्क साधला आहे.

अलीकडेच मोहसिन सोशल मीडियावर हृदयविकाराच्या झटक्याचा खुलासा केला होता. यामुळे आरोग्यासाठी त्यांनी इंडस्ट्रीतून छोटा ब्रेक घेतला होता. आपल्या प्रकृतीची काळजी मोहसिन घेत होता. तसेच, मोहसीनने यावेळी असेही सांगितले होते की, तो आता पूर्णपणे बरा झाला आहे आणि नवीन प्रोजेक्टसाठी खूप उत्सुक आहे. आता बिग बॉसच्या निर्मात्यांना मोहसिनने त्यांच्या शोमध्ये सहभागी व्हावे असे वाटते. त्यामुळे निर्मात्यांनी त्याला मोठ्या रकमेची ऑफरही दिल्याचे ऐकायला मिळते.

मोहसिन खान - बिग बॉस सहभागी होणार?

आपल्या शांत स्वभावासाठी प्रसिद्ध असलेला मोहसिन (Mohsin Khan) बिग बॉससारख्या शोमध्ये स्वत:ला कसा सिद्ध करेल आणि छान गेम खेळेल हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. तसेच त्याची लोकप्रियता लक्षात घेऊन त्याला शोमध्ये घेण्यासाठी निर्माते देखील खूप उत्सुक आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, सध्या मोहसिनला शोमध्ये सामील करण्यासाठी दिलेली ऑफर ही या सीझनमधील सर्वात जास्त रक्कमेची आहे, म्हणजेच मोहसिनने हा शो केल्यास तो सर्वात जास्त मानधन घेणारा कलाकार ठरेल. मात्र अद्याप कोणताही खुलासा मोहसिन खान किंवा बिग बॉस कडून झाला नाही आहे.

मोहसिन खान लव्ह लाईफ

स्वतःला नेहमीच वादापासून दूर ठेवणाऱ्या मोहसिन खानचे नाव शिवांगी जोशीसोबत जोडले गेले होते. त्यांच्या अफेअरच्या बातम्या सोशल मीडियावर खूप व्हायरल झाल्या होत्या. दोघेही अनेकदा सेटवर आणि कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले. त्यांची ऑन-स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. मात्र मोहसिन खान आणि शिवांगी जोशी या दोघांनीही त्यांच्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यांच्या नात्याबद्दल प्रश्न विचारल्यावर दोघांनी सांगितले की, ते एकमेकांचे चांगले मित्र आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Virar: विरारमध्ये सूर्या धरणाची मुख्य पाईपलाईन फुटली, ३० ते ४० फूट उंच पाण्याचे फवारे उडाले; VIDEO व्हायरल

Pineapple Sheera Recipe: सकाळचा नाश्तासाठी झटपट करा टेस्टी पायनॅपल शिरा, लहान मुलांपासून सगळे घरातले होतील खूश

Nalasopara: गटारावरील लोखंडी जाळीत महिलेचा पाय अडकला, जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल; VIDEO

Top 10 Diamonds: जगातले सर्वात मोठे TOP 10 हिरे कोणते? तुम्हाला ही माहितीये का?

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये काही पेट्रोल पंपांवर नागरिकांच्या रांगा

SCROLL FOR NEXT