Mitali- Siddharth Good News Rumours Instagram
मनोरंजन बातम्या

Mitali- Siddharth Good News Rumours: सिद्धार्थ- मिताली ‘गुड न्यूज’ देणार?, अभिनेत्रीने शेअर केलेल्या कॅप्शनने वेधलं लक्ष

Mitali Mayekar Photo: सोशल मीडियावर सिद्धार्थ- मिताली ही जोडी लवकरच गुड न्यूज देणार असल्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

Chetan Bodke

Mitali Mayekar Siddharth Chandekar News:  मराठी टेलिव्हिजनसृष्टीत नेहमीच रोमँटिक फोटोंसाठी चर्चेत राहणाऱ्या सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर सध्या एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. या जोडीने २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली असून हे क्यूट कपल नेहमीच आपल्या हटक्या लव्हस्टोरी मुळे चर्चेत असतात. सिद्धार्थ- मिताली या दोघांनीही प्रेक्षकांचे मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे. नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या मिताली एका पोस्टमुळे बरीच चर्चेत आली आहे. सध्या सोशल मीडियावर ही जोडी लवकरच गुड न्यूज देणार असल्याची चर्चा होत आहे.

नेहमीच वेगवेगळ्या फोटोंसाठी चर्चेत राहणाऱ्या मिताली- सिद्धार्थच्या रोमँटिक फोटोंची सोशल मीडियावर अनेकदा चर्चा होते. गेल्या काही दिवसांपूर्वी ही जोडी युरोप ट्रिपमध्ये व्यग्र होते. पॅरिसमधील सिद्धार्थ- मितालीच्या आयफेल टॉवरवरील रोमँटिक फोटोंनी इंटरनेटवर बरीच चर्चा झाली होती. दरम्यान, मितालीच्या बिकीनीतील फोटोंनीही नेटकऱ्यांचे लक्ष वेधले होते. नुकतेच मितालीने शेअर केलेल्या एका फोटोमुळे सोशल मीडियावर ही जोडी लवकरच गुडन्यूज देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोत, मिताली काळ्या रंगाच्या वनपीसमध्ये दिसत आहे. कर्ली केस आणि लाईट मेकअप करत अभिनेत्रीने आपला लूक पुर्ण केला आहे. फोटो क्लिक करताना अभिनेत्री एका बेंचवर बसलेली दिसत असून या पोस्टला ‘मॉमीज गेटिंग हॉट’ असं कॅप्शन देत फोटो शेअर केला आहे. मितालीने पोस्टला कॅप्शन देताना, मम्मी म्हटल्यामुळे तिच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या नजरा खिळल्या आहेत. अनेक युजर्सने तिच्या कमेंटवर मम्मी म्हटलं आहे. तर अनेकांनी तिच्यावर अभिनंदनाचाही वर्षाव केला आहे.

नेहमीच हटक्या कॅप्शनसाठी ओळखली जाणारी मिताली यावेळी कॅप्शनमुळे चर्चेत आली आहे. मितालीचे हे कॅप्शन पाहून नेटकऱ्यांनी तू खरंच गुड न्यूज देणार आहे का? असा प्रश्न विचारला. मम्मी म्हणजे तुला नक्की काय म्हणायचंय?, तुम्ही खरंच आईबाबा होणार आहात का? असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांनी मिताली- सिद्धार्थला सोशल मीडियावरून विचारले.

मिताली- सिद्धार्थ यांनी २४ जानेवारी २०२१ रोजी पुण्यातील ढेपेवाड्यात मराठमोळ्या पद्धतीने लग्नगाठ बांधली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ चांगलेच व्हायरल झाले आहेत. लग्नाआधी ही जोडी काही काळासाठी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT