Shoaib Ibrahim And Deepika Kakakr Romantic Photo Instagram
मनोरंजन बातम्या

Shoaib Ibrahim Post: दीपिकाचा पहिल्यांदा आई झाल्यानंतरचा फोटो आला समोर, शोएबने शेअर केला रोमँटिक क्षण...

Shoaib Ibrahim And Deepika Kakakr Photos: शोएबने नुकताच सोशल मीडियावर एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे.

Chetan Bodke

Shoaib Ibrahim And Deepika Kakakr Romantic Photo: ‘ससुराल सिमर का’ फेम दीपिका कक्कर सध्या चर्चेत आहे. तिने २१ जूनला चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. दीपिका आणि शोएबचे बाळ काही दिवसांपूर्वी बाळ प्रिमॅच्युअर असून ते इनक्यूबेटरमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे. नुकताच दीपिका आणि शोएबने एक फोटो शेअर केला आहे. शोएबने एक हॉस्पिटलमधील फोटो शेअर केला आहे.

दीपिका कक्कर आणि शोएबच्या चाहत्यांना त्यांच्या पहिल्या बाळाची झलक पाहत आहे. अनेकदा पोस्टमध्ये चाहत्यांनी बाळाचा फोटो दाखव अशी देखील कमेंट केली आहे. शोएब नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो. शोएबने अनेकदा सोशल मीडियावर त्याच्या बायकोसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

शोएबने नुकताच सोशल मीडियावर एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. शेअर केलेला फोटो हा हॉस्पिटलमधला असल्याचे दिसत आहे. शेअर केलेल्या रोमँटिक फोटोत, दीपिकाचे डोळे मिटले असून तिच्या चेहेऱ्यावर एक स्मित हास्य दिसत आहे. दोघांच्या ही चेहेऱ्यावरील स्मित हास्य असलेला फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

दीपिका आणि शोएबच्या या फोटोवर अनेक सेलिब्रिटींनी, मित्रांनी सोबतच चाहत्यांनी देखील त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. गौहर खानने देखील दोघांचेही अभिनंदन केले आहे. सोबतच चाहत्यांनी त्यांच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. दीपिकाने जानेवारीमध्ये चाहत्यांसोबत गुड न्यूज शेअर केली होती. तेव्हा पासून अभिनेत्रीच्या प्रेग्नेंसीची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. गेल्या २१ जून रोजी अभिनेत्रीने एका चिमुकल्या बाळाला जन्म दिला आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी एका इंग्रजी संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत शोएब इब्राहिम म्हणतो, “तुम्हाला सर्वांना माहित आहे की, दीपिका आणि मी आई-बाबा झालो आहोत. आम्हाला मुलगा झाला आहे. पण सध्या मी जास्त काही बोलू इच्छित नाही. बाळ प्रिमॅच्युअर असून ते इनक्यूबेटरमध्ये आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी माझ्या लहान बाळासाठी प्रार्थना करावी, अशी माझी इच्छा आहे. इंशाल्लाह जेव्हा आमचं बाळ जेव्हा ठिक होईल त्यावेळी मी तुमच्या सर्वांसोबत नक्कीच संवाद साधेल.”

गेल्या काही दिवसांपूर्वी दीपिकाने एका मुलाखतीत अभिनय क्षेत्राला रामराम करणार असल्याची घोषणा केली होती. तिच्या मातृत्वाचा संपूर्ण काळ ती आनंदात घालवणार असल्याचंही म्हणाली होती. दीपिकाच्या या घोषणेने चाहत्यांना मात्र धक्काच बसला होता. दीपिकाने २० जूनला पती शोएबचा वाढदिवस साजरा केला होता. त्याच्यासाठी खास व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून शुभेच्छा दिल्या होत्या. शोएबनेही आयुष्याच्या नव्या टप्प्यात पाऊल टाकत आहे, अशी इमोशनल पोस्ट शेअर केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cyclone Montha: आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यावर १०० किलोमीटर स्पीडनं धडकलं चक्रीवादळ; 'मोंथा' नावाचा अर्थ काय?

Ladki Bahin Yojana: लाडकीची भरभराट, तिजोरीत खडखडाट, लाडकीसाठी वर्षाला 43 हजार कोटींचा खर्च

Satara News : डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट; PSI बदनेचा पाय आणखी खोलात जाणार, पोलिसांकडून महत्वाचा तपास सुरु

PSI बदने सापडला, मोबाईल मात्र गायब, बदनेच्या मोबाईलमध्ये आत्महत्येचं गूढ?

IND Vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेला उद्यापासून सुरुवात, कधी अन् कुठे पाहाल लाईव्ह सामना?

SCROLL FOR NEXT