Shalva Kinjawadekar Soon Tie Knot With Shreya Daflapurkar Instagram
मनोरंजन बातम्या

Shalva Soon Tie Knot With Shreya : आणखी एक टिव्ही कपल बांधणार लवकरच लगीनगाठ, शाल्व-श्रेयाच्या घरी लगीनघाई सुरू

Shalva Kinjawadekar And Shreya Daflapurkar Wedding : ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेमधून टिव्ही अभिनेता शाल्व किंजवडेकर चर्चेत आला होता. सध्या अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आलेला आहे.

Chetan Bodke

Shalva Kinjawadekar And Shreya Daflapurkar Wedding

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेमधून टिव्ही अभिनेता शाल्व किंजवडेकर चर्चेत आला होता. सध्या अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आलेला आहे. गेल्या वर्षी अभिनेता शाल्व किंजवडेकर आणि त्याची गर्लफ्रेंड श्रेया डफळापुरकरचा साखरपुडा झाला होता. आता साखरपुड्यानंतर शाल्व आणि श्रेया लग्न करणार असल्याची माहिती मिळत आहे. एका इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून त्यांच्या लग्नाची चर्चा होत आहे. (Televesion Actor)

नुकताच शाल्व आणि श्रेयाचा लग्नाचा मुहूर्त पार पडला आहे. या कार्यक्रमादरम्यानचा फोटो श्रेया डफळापुरकरने इन्स्टा स्टोरीवर रिशेअर केलेला आहे. या फोटोला तिने "मुहूर्त" असं कॅप्शन दिलेला आहे. लवकरच, शाल्व आणि श्रेया लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. परंतु, दोघांनीही लग्नाच्या तारखेची अधिकृतपणे घोषणा केलेली नाही. गेल्या वर्षी शाल्व-श्रेयाचा साखरपुडा झाला होता. आता साखरपुड्यानंतर त्यांच्या लग्नाची चाहत्यांमध्ये चर्चा होत आहे. (Marathi Actress)

Shalva Kinjawadekar Soon Tie Knot With Shreya Daflapurkar

दोघांच्याही कामाबद्दल बोलायचे तर, टिव्ही अभिनेता शाल्व किंजवडेकरला ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेमधून फार मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. सध्या अभिनेता झी मराठीवरील ‘शिवा’ मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मालिकेमध्ये तो प्रमुख भूमिका साकारत आहे. तर त्याची गर्लफ्रेंड श्रेया डफळापुरकरबद्दल बोलायचे तर, ती सेलिब्रिटी स्टायलिस्ट आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Rain : कृष्णा आणि वारणा नदीवरील १६ बंधारे पाण्याखाली; शेतांमध्ये साचले पाणी

Realme 15 आणि 15 pro सिरीजची एंट्री! जाणून घ्या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये काय आहे खास

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे घेणार पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट

Baramati Accident: सोन्यासारखा मुलगा आणि २ नातींचा अपघाती मृत्यू, धक्का सहन न झाल्याने आजोबांनीही सोडलं प्राण

'अल्लाहू अकबर...विमानात बॉम्ब आहे' प्रवाशानं घातला गोंधळ, VIDEO समोर; विमानात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT