Akshaya Deodhar And Hardik Joshi Mangalagaur Photos Saam Tv
मनोरंजन बातम्या

Akshaya- Hardik Mangalagaur: राणा दा अन् अंजलीबाईंची लग्नानंतरची पहिली मंगळागौर दणक्यात साजरी, सोहळ्याचे फोटो पाहतच राहाल...

Akshaya- Hardik Mangalagaur Photos: हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी त्यांच्या लग्नानंतरची पहिली मंगळागौर काल साजरी केली.

Chetan Bodke

Akshaya Deodhar And Hardik Joshi Mangalagaur Photos

श्रावण महिना म्हटलं की सर्वत्र मंगळागौर खेळाची चर्चा सुरू होते. सध्या अनेक मालिकांमध्ये मंगळागौर खेळाचे स्पेशल एपिसोड्स टेलिकास्ट केले जात आहेत. गेल्या वर्षी २ डिसेंबरला हार्दिक- अक्षय या क्यूट कपलने लग्नगाठ बांधली होती. आपल्या लग्नानंतरची पहिली मंगळागौर नुकतीच यांनी साजरी केली आहे. लग्नानंतरची पहिली मंगळागौर म्हटलं की नववधु साठी तो खेळ काही तरीच खास असतो. सध्या त्यांचा मंगळागौर खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी अक्षयाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर खास मेहंदी काढतानाचा व्हिडीओ आणि फोटो शेअर केला होता. तेव्हापासून तिच्या मंगळागौर खेळीची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी त्यांच्या लग्नानंतरची पहिली मंगळागौर काल साजरी केली. मंगळागौर साजरे करतानाचे फोटो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान दोघांच्याही लूकबद्दल बोलायचे तर, हार्दिक- अक्षयाने सोनेरी रंगाचा मॅचिंग ड्रेस परिधान केला होता. सोबतच, दोघांनी घरी महादेवाची आलिशान सजावट करुन विधिवत पूजा केली. यावेळी अक्षया आणि हार्दिकचे नातेवाईक या खास सोहळ्याला उपस्थित होते.

हार्दिक आणि अक्षयाबद्दल बोलायचे तर, या दोघांनीही ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमध्ये एकत्र काम केलं होतं. रिल लाईफमध्ये एकमेकांचे असलेले जोडीदार रियल लाईफमध्येही एकमेकांचे जोडीदार झाले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी हार्दिक जोशी, अक्षया देवधरसह इतर मराठी कलाकारांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिंदे गटाच्या शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला होता.

दोघांच्याही वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, लवकरच हार्दिक जोशी, महेश मांजरेकरांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटात तो प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. सोबतच हार्दिक सध्या ‘तुझ्यात जीव रंगला’नंतर ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेमध्ये अभिनय करतोय. तर अक्षयाबद्दल बोलायचे तर, ती सध्या कोणत्याही चित्रपटात किंवा मालिकेमध्ये नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates : पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Sanjay Raut News : संजय राऊतांचा काँग्रेसला इशारा, म्हणाले आमच्याकडूनही तशी चूक होईल

Crime News : दिवाळीसाठी गावाकडे निघालेल्यांनो सावधान, गर्दीत चोरटे करतायेत हात साफ; पाहा धक्कादायक CCTV व्हिडीओ

Umesh-Priya : लपवा-लपवीचे दिवस अन् पेपरात फोटो; उमेशने सांगितला रिलेशनशिपचा हटके किस्सा!

Suraj Chavan: सूरज चव्हाणच्या नव्या घराचं भूमिपूजन, सोहळ्याच्या Video आला समोर

SCROLL FOR NEXT