Yek Number Movie Saam Tv
मनोरंजन बातम्या

Yek Number Movie: 'कपाळी टिळा अन् करारी नजर...' तेजस्विनी पंडितच्या 'येक नंबर' चित्रपटाची रिलीजची तरीख ठरली!

Yek Number Movie Poster Released: तेजस्विनी पंडितच्या 'येक नंबर' चं मोशन पोस्टर रिलीज झालं आहे.

Manasvi Choudhary

अभिनेत्री तेजस्विनी पंडीत निर्मित 'येक नंबर' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चित्रपटाची तुफान चर्चा होती. अलिकडेच अभिनेत्री तेजस्विनी पंडितसोबतचा राज ठाकरे यांच्या भूमिकेतील व्यक्तीचा फोटो व्हायरल झाला होता. ज्यामुळे चित्रपट राज ठाकरे यांच्यावर आधारित आहे अशा चर्चा रंगल्या. नुकतंच आता चित्रटाचे मोशन पोस्टर रिलीज झालं आहे.

'येक नंबर' हा चित्रपट येत्या १० ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. पोस्टरमध्ये चित्रपटातील कलाकार धैर्यशील घोलप हा कठोर भूमिकेत दिसतो आहे. त्याचा हा आगळा वेगळा रूप प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे. तसेच मागे कपाळी लाल टिळा अन् काळ्या चश्म्यातील ती करारी नजर महाराष्ट्रातील प्रमुख व्यक्तिमत्वाची दिसते आहे.

राज ठाकरे यांच्या भूमिकेत काम करणाऱ्या अभिनेत्याचा आणि तेजस्वीनी पंडितचा एक फोटो व्हायरल झाला होता. ज्यामुळे चित्रपट नेते राज ठाकरे यांच्या बायोपिकवर आहे असे बोलले जात होते.

निर्माते तेजस्विनी पंडीतने पोस्ट शेअर करत,‘’अनेकदा प्रेक्षकांची तक्रार असते की मराठी चित्रपटांमध्ये तांत्रिकदृष्ट्या, सादरीकरणात भव्यता नसते. आणि हाच समज दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. या चित्रपटात अनेक कुशल, सर्वोत्कृष्ट तंत्रज्ञांचा सहभाग आहे. ही भव्यता तुम्हा प्रेक्षकांना पडद्यावर नक्कीच दिसेल. मराठी चित्रपटांना एका वेगळ्या उंचीवर नेणारा आणि मराठी चित्रपटाची रूपरेषा बदलणारा ‘येक नंबर’ असेल. आणि ह्याचं श्रेय चित्रपटाशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाला जातं. त्यामुळे आता प्रेक्षकांनो, लक्ष असुद्या !असं म्हटलं आहे. तेजस्विनी पंडित आणि वरदा साजिद नाडियाडवाला येक नंबर चित्रपटाचे निर्माते आहेत. तर अजय- अतुल यांनी चित्रपटाला संगीत दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नागपूरातील नंदनवन परिसरात कॅफे जाळला!

Border 2 vs Mardaani 3 Collection : 'बॉर्डर 2'च्या कमाईत दुसऱ्या सोमवारी घसरण; 'मर्दानी 3' देतोय तगडी टक्कर, वाचा कलेक्शन

Navi Mumbai : पोलीस दलात खळबळ! नवी मुंबई पोलीस खात्यातील वरिष्ठ निरीक्षक निलंबित

Kokan Railway: कोकण रेल्वेसाठी स्वंतत्र आर्थिक तरतूद करा; कोकणवासियांची मागणी

Dusky Skin Lipstick Shades : सावळ्या रंगावर कोणती लिपस्टिक उठून दिसेल?

SCROLL FOR NEXT