Rashmika- Vijay: अभिनेत्री रश्मिका मंदान्ना आणि अभिनेता विजय देवरकोंडा काही काळापूर्वी करण जोहरच्या 'कॉफी विथ करण ९' या शोमध्ये सहभागी झाले होते. तिथे त्यांनी त्यांच्या लग्नाबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या पण त्यानंतर त्यांना सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलिंग व्हायला सुरुवात झाली. आता या कलाकारांनी सोशल मिडियावर त्यांच्याबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेला आता कायदेशीर वळण मिळाले आहे. या दोन्ही कलाकारांच्या टीमने चुकीची माहिती पसरवणे आणि ऑनलाइन छळ केल्याप्रकरणी हैदराबाद सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. सोशल मीडियावरून पसरवल्या जाणाऱ्या ट्रोलिंगसाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांच्या टीमने सायबर क्राईम अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीसोबत तपासासाठी आवश्यक असलेल्या काही सोशल मीडिया पोस्ट, ऑनलाइन आर्टिक्लस, मिम्स आणि लिंक्सही जोडण्यात आल्या आहेत. या प्रकरणाची कायद्यानुसार चौकशी करण्याची मागणी टीमने केली आहे. कलाकारा टीमने या दोन्ही कलाकारांना टार्गेट करून जाणीवपूर्वक छळ केल्याचा आरोप केला आहे. मात्र, या आरोपांबाबत अद्याप तपासातून काय निष्पन्न झाले नाही.
करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण ९’ या शोमध्ये विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांनी त्यांच्या नात्याबद्दल आणि लग्नाबद्दल खुलासा केला. शोदरम्यान रश्मिकाने सांगितले की, तिने विजयला लग्नाबद्दल विचारले होते आणि जवळपास वर्षभर तिने त्याला लग्नासाठी विचारले. कारण, विजयने तिला लग्नासाठी तब्बल १०० वेळा विचार असे सांगितले होते. या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली. काही नेटकऱ्यांनी विजयच्या प्रतिक्रियेवर टीका करत त्याला ‘रेड फ्लॅग’ म्हटले, तर काहींनी रश्मिकाची बाजू घेतली. वाढत्या ट्रोलिंगनंतर रश्मिकाने स्पष्ट केले की, त्यांच्यासाठी लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे होते. त्यानंतर दोघांच्या टीमने बनावट मजकूर, स्क्रीनशॉट्स आणि ऑनलाइन छळाबाबत हैदराबाद सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल केली.
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना ही लोकप्रिय जोडी आगामी ‘रणबाली (Ranabaali)’ या चित्रपटातून पुन्हा एकदा एकत्र पडद्यावर दिसली. राहुल सांकृत्यायन दिग्दर्शित हा चित्रपट १९व्या शतकातील भारताच्या पार्श्वभूमीवर आधारित असून, ब्रिटिश राजवटीच्या काळातील ऐतिहासिक घटनांपासून प्रेरित आहे. या चित्रपटात विजय देवरकोंडा प्रमुख भूमिकेत असून, रश्मिका मंदान्ना जयम्मा ही व्यक्तिरेखा साकारली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.