Ek Phool Song  Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ek Phool Song: एक फूल वाहतो सखे, जवा तुला पाहतो सखे; 'टीडीएम' मधील रोमँटिक गाणं चर्चेत

नुकतंच चित्रपटातील 'एक फुल' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून गाण्याने प्रेमीयुगुलांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे.

Chetan Bodke

Ek Phool Song: आजवर असे अनेक चित्रपट आहेत जे चित्रपटाच्या कथेसह चित्रपटातील गाण्यामुळे चर्चेत राहिलेत. अशातच भर घालत एक आगळावेगळा विषय घेऊन 'टीडीएम' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची खासियत म्हणजे चित्रपटातील गाणी. नुकतंच चित्रपटातील 'एक फुल' हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून प्रेमीयुगुलांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे.

'व्हॅलेंटाईन डे'चे औचित्य साधत 'टीडीएम' चित्रपटातील 'एक फुल' हे गाणं प्रेक्षकांसमोर आलं असून या रोमँटिक गाण्याच्या संगीताची जबाबदारी संगीतकार रोहित नागभिडे यांनी पेलवली आहे. तर गाण्याच्या ओळी डॉ. विनायक पवार यांनी शब्दबद्ध केल्या आहेत. आणि प्रसिद्ध पार्श्वगायिका प्रियंका बर्वे आणि ओमकारस्वरूप बागडे यांनी त्यांच्या सुमधुर आवाजाने गाण्याला चारचाँद लावले आहेत.

'टीडीएम' चित्रपटातील नवोदित जोडगोळी अभिनेता पृथ्वीराज आणि अभिनेत्री कालिंदी हे या गाण्यावर थिरकलेले पाहायला मिळत आहेत. आता 'एक फुल' या गाण्याने रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतल्यानंतर साऱ्यांच्या नजरा चित्रपटातील इतर गाण्यांकडे वळल्या आहेत. मात्र त्यासाठी काही क्षणाचा विलंब लागणार आहे. लवकरात लवकर चित्रपटातील इतर गाणी ही ठेका धरायला लावण्यास सज्ज होणार आहेत, यांत शंकाच नाही.

'चित्राक्ष फिल्म्स' आणि ' स्माईल स्टोन स्टुडिओ' प्रस्तुत 'टीडीएम' चित्रपटाच्या निर्मितीची आणि दिग्दर्शनाची धुरा भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी पेलवली आहे. 'ख्वाडा' आणि 'बबन' चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर एक आगळावेगळा विषय ते या चित्रपटातून मांडणार आहेत.

'ख्वाडा' आणि 'बबन' चित्रपटातील गाणी तर आजही लोकांना भुरळ पाडतायत यातच आता भर घालत 'टीडीएम' चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतील यांत शंका नाही. २८ एप्रिल २०२३ ला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अमरावती मनपाची धडक कारवाई, 36.45 लाखांच्या थकबाकीसाठी दोन मालमत्ता सील

भाजपची राज्यसभेसाठी ११ नावांची घोषणा; २ बड्या केंद्रीय मंत्र्यांचा पत्ता कट, मोदी मंत्रिमंडळात फेरबदल होणार?

8th Pay Commission : कामाची बातमी! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या टेक होम पगारात मोठी वाढ? सरकार लागू करू शकतं हा फॉर्म्यूला

वजन वाढणारच नाही! सकाळी नाश्त्याला अरबट-चरबट खाण्यापेक्षा खा 'हे' 4 हाय-प्रोटीन पदार्थ; दिवसभर राहाल फिट

Paranoia symptoms: प्रत्येक गोष्टीत कटकारस्थान दिसतंय? तज्ज्ञांनी सांगितली पॅरानोइयाची धोकादायक लक्षणं आणि कारणं

SCROLL FOR NEXT