Tarak Mehta Ka Ooltah Chashma Saam Tv
मनोरंजन बातम्या

Tarak Mehta Ka Ooltah Chashma शोमधून आत्माराम भिडे घेणार एक्झिट? अभिनेत्याने स्वत:च केला खुलासा

Tarak Mehta Ka Ooltah Chashma Show: 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतील गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी आत्माराम तुकाराम भिडे उर्फ मंदार चांदवडकर हे मालिका सोडत असल्याची चर्चा आहे.

Manasvi Choudhary

टिव्हीवरील लोकप्रिय 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेबाबत रोज नवीन अपडेट येत आहेत. अशातच या मालिकेतील अनेक कलाकारांनी या मालिकेला राम राम ठोकला आहे. अलिकडेच मालिकेतील अब्दुल उर्फ शरद सांकलाने मालिकेला निरोप दिल्याचं बोललं जातं होतं. आता आणखी एका कलाकाराने मालिकेचा निरोप घेतल्याची चर्चा सुरू आहे.

'तारक मेहता का उल्टा चश्मा' मालिकेतील गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी आत्माराम तुकाराम भिडे उर्फ मंदार चांदवडकर हे मालिका सोडत असल्याची चर्चा आहे. दरम्यान अभिनेत्याने स्वत: यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे., मंदार चांदवडकरने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केली आहे.

व्हिडीओमध्ये, तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका सोडणार असल्याची अफवा सुरू होती. यावर मंदारने प्रतिक्रिया दिली आहे. त्याने, ' कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका... आणि कृपया अश्या अफवा पसरवू नका... TMKOC शो 2008 पासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे आणि येत्या काही वर्षात हा शो असाच सुरू राहील.. फक्त सत्य तुमच्यासमोर आणायचे आहे म्हणून मी ही पोस्ट केली आहे. धन्यवाद आणि खूप खूप प्रेम #tmkoc'असं कॅप्शन दिलं आहे.

'तारक मेहता का उल्टा चश्मा ' हि मालिका गेल्या १६ वर्षापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतून अनेक कलाकारांनी प्रेक्षकांना आपलेसे करून ठेवले आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण ही मालिका आवडीने पाहतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश अन् ३ महिन्यांचा अल्टीमेटम

शिवसेनेच्या मेळाव्यात असं काय घडलं? 'या' वक्त्याच्या भाषणाने ठाकरेंच्या डोळ्यांत आणलं पाणी

मी शिवसेना पक्षप्रमुखपद सोडायला तयार; शिवसैनिकांसमोरच उद्धव ठाकरेंचे मोठं विधान

'आमची पोरं कशाला पळवता? स्वतःच्या वांझोट्यापणावर उपचार करा'; शिवसेना पुन्हा फुटल्यावर ठाकरेंनी घेतला तिखट शब्दात समाचार

Maharashtra News Live Update: निवडणुकीआधी लाडकी बहीण.... आणि नंतर ८० लाख महिलांना अपात्र ठरवले. - उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT