Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18 : दयाबेनचा चक्क बिग बॉसला नकार, ६५ कोटीही धुडकावले, नेमकं कारण काय?

Disha Vakani : लवकरच बिग बॉस 18 प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र तारक मेहता फेम दिशा वकानीने बिग बॉसची ऑफर नाकारली आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस 18' (Bigg Boss 18) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सर्वांचे लक्ष कोण स्पर्धक या सीझनमध्ये पाहायला मिळणार याकडे आहे. 'तारक मेहता फेम' दिशा वकानीने 'बिग बॉस 18' ची ऑफर नाकारल्याची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, दिशा वकानीला बिग बॉसची ऑफर देण्यात आली होती. तिच्याशी शोच्या निर्मात्यांनी अनेक वेळा संपर्क साधला. असल्याचे बोले जात आहे. मात्र दयाबेनने नेहमी नकार दिला आहे. 'बिग बॉस' ने दिशाला 65 कोटी रुपयांची ऑफर दिली होती. ही ऑफर आतापर्यंतची सर्वात मोठ्या रक्कमेची ऑफर होती. मात्र दिशा (Disha Vakani) ही ऑफर नाकारली.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या कॉमेडी शोमुळे दिशा वकानी म्हणजे लाडकी दयाबेन घरोघरात पोहची. तिला या शोमुळे खूप प्रसिद्धी मिळाली. दिशाने आपल्या प्रेग्नेंसी दरम्यान 'तारक मेहता' मधून ब्रेक घेतला. मात्र त्यानंतर दिशा पुन्हा कधीच 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये आली नाही. अनेक वेळा तिच्या येण्याचे किस्से शोमध्ये दाखवले गेले.

6 ऑक्टोबरपासून 'बिग बॉस 18' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोमध्ये यंदा मोठे सेलिब्रिटी पाहायला मिळणार आहे. या शोचे होस्टिंग भाईजान म्हणजे सलमान खान करणार आहे. या वेळी 'बिग बॉस 18' ची थीम वेळेवर आधारित असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मालदिवपेक्षाही सुंदर! भारतातील 'हे' ठिकाण

UP Politics : 19 उपाध्यक्ष, 8 महामंत्री; निवडणुकीआधी राज्यातील भाजपमध्ये मोठा उलटफेर

Modi Cabinet Reshuffle: मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये IAS अधिकाऱ्याला मिळणार मंत्रिपद, कोण आहेत त्या महिला खासदार?

Maharashtra News Live Update: नाशिकमधील मक्याच्या शेडमध्ये आढळला विषारी कोब्रा

Krishi Thapanda: धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी आढळला ३३ वर्षीय मित्राचा मृतदेह; पोलिसांकडून तपास सुरू

SCROLL FOR NEXT