Tara Sutaria-Veer Pahariya Breakup  saam tv
मनोरंजन बातम्या

Tara Sutaria-Veer Pahariya Breakup: तारा सुतारिया-वीर पहाडिया यांचा ब्रेकअप? गायकाला किस करणं पडलं महागात

Tara-Veer Breakup : बॉलिवूड कपल तारा सुतारिया-वीर पहाडिया गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या नात्यामुळे चांगलेच चर्चेत आहेत. अशात त्यांचा ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली आहे.

Shreya Maskar

तारा सुतारिया आणि वीर पहारिया हे बॉलिवूड कपल सध्या चांगले चर्चेत आहे.

अलिकडेच एपी ढिल्लों या गायकाने ताराला लाइव्ह कॉन्सर्टमध्ये किस केली.

तारा सुतारिया आणि वीर पहारियाचा ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली आहे.

तारा सुतारिया आणि वीर पहारिया हे बॉलिवूड कपल गेल्या काही दिवसांपासून चांगले चर्चेत आहे. दोघे एकमेकांना खूप वेळापासून डेट करत आहे. मात्र आता त्यांच्या नात्यात दुरावा आला असून त्यांचा ब्रेकअप झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अद्याप याचे कारण कळले नाही. पण अलिकडेच तारा सुतारियाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यात ती एका प्रसिद्ध गायकाला किस करताना दिसली. जे पाहून वीर पहाडिया प्रचंड संतापला.

प्रसिद्ध गायक एपी ढिल्लोंचा काही दिवसांपूर्वी लाइव्ह कॉन्सर्ट होता. त्याचा आवाज ऐकण्यासाठी चाहत्यांची तुफान गर्दी केली होती. या कॉन्सर्टला तारा सुतारिया आणि वीर पहारिया देखील गेले होते. या कॉन्सर्टमध्ये एपी ढिल्लों गाणे गाताना ताराला स्टेजवर बोलावतो. त्यानंतर एपी गाणे गाताना दिसतो तर तारा गाण्याचा आनंद घेताना दिसली. त्यानंतर एपी ढिल्लों ताराला मिठी मारतो आणि तिच्या गालावर किस करतो. तिच्यासोबत स्टेजवर नाचतो. तर एपीच्या खांद्यावर हात ठेवून तारा देखील कॉन्सर्ट एन्जॉय करताना दिसते.

तारा सुतारिया आणि एपी ढिल्लोंचा हा अंदाज कॉन्सर्ट पाहायला आलेला वीर पहारिया देखील पाहतो. आपल्या गर्लफ्रेंडची गायकासोबत अशी जवळीक पाहून अभिनेता चांगलाच संतापतो. तिच्या रिएक्शन सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्या. गायकाने ताराला किस करताच रागाने वीरचा तीळ पापड होतो. त्यानंतर तारा आणि वीरने तो व्हिडीओ चुकीच्या पद्धतीने एडिट केल्याचे सांगितले होते.

आता फिल्मफेअरच्या वृत्तानुसार, तारा सुतारिया आणि वीर पहाडिया यांचा ब्रेकअप झाला आहे. मात्र अद्याप तारा-वीरने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. त्यांनी ही बाब खासगीत ठेवली आहे. तारा आणि वीरने 2025 च्या सुरुवातीपासून एकमेकांना डेट करत होते. ही दोघे अनेकदा एकत्र स्पॉट झाले. त्यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडायची. अनेक कार्यक्रमात देखील दोघे एकत्र दिसायचे. त्यांनी सण समारंभ, वाढदिवस एकत्र साजरे केले. सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो देखील पोस्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जळगावमध्ये भीषण अपघात! ट्रक-दुचाकीच्या धडकेत एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू; अख्ख कुटुंब संपलं

DA Hike 2026: सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार गुड न्यूज, महागाई भत्ता कितीने वाढणार?

Business Ideas For Women: महिलांसाठी कमी खर्चात होममेड ज्वेलरीचा बिझनेस; घरबसल्या व्हाल माला माल

Maharashtra News Live Update: ऐन दुष्काळात हजारो लिटर पाण्याची नासाडी; मालेगावला पाणीपुरवठा करणाऱ्या पाइपलाइनला गळती

पुण्यात खळबळ! संरक्षण उत्पादन क्षेत्रातील कंपनीवर CBI ची मोठी कारवाई; लाचखोरी अन् संवेदनशील माहिती उघड? बड्या अधिकाऱ्याला अटक

SCROLL FOR NEXT