Tanushree Dutta-Nana Patekar Latest Bollywood News SAAM TV
मनोरंजन बातम्या

Tanushree Dutta : मला काहीही झालं तर नाना पाटेकर... तनुश्री दत्ताच्या सोशल पोस्टने खळबळ

तनुश्री दत्ताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपल्या मनातील दुःख सांगितलं आहे.

Nandkumar Joshi

मुंबई: तनुश्री दत्तानं पुन्हा एकदा सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तिने लांबलचक पोस्ट शेअर करून आपल्या मनातलं सर्व काही सांगून टाकलं. मला काहीही झालं तर त्यासाठी केवळ नाना पाटेकर आणि बॉलिवूड माफिया हेच जबाबदार असतील, असं तनुश्रीनं पोस्टमध्ये म्हटलं आहे. (Tanushree Dutta-Nana Patekar Latest News)

बॉलिवूडमध्ये (Bollywood) खळबळ उडवून देणारी पोस्ट तनुश्री दत्ताने सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिने इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक लाबलचक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिनं आपल्या मनातील दुःख सांगितलं आहे.

'आशिक बनाया आपने' या चित्रपटातील अभिनेत्री तनुश्री दत्ता (Tanushree Dutta) हिने आज सकाळी पोस्ट शेअर करून नाना पाटेकर (Nana Patekar) आणि बॉलिवूड माफियांवर आरोप केले आहेत. तसेच इंडस्ट्रीतील काही कलाकार आणि पत्रकारांवरही चुकीच्या बातम्या चालवल्या जात असल्याचा आरोप केला आहे.

अनेक जण आपल्याला टार्गेट करत आहेत. तसेच ते आपल्याला त्रास देत आहेत, असा आरोपही तनुश्रीने केला आहे. 'जर मला काहीही झाले तर, त्यासाठी नाना पाटेकर आणि बॉलिवूडमधील काही माफिया जबाबदार असतील,' असे तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

'जर मला काहीही झालं तर, #metooमधील आरोपी नाना पाटेकर, त्यांचे वकील, सहकारी आणि बॉलिवूडमधील माफिया दोस्त जबाबदार आहेत. बॉलिवूड माफिया कोण आहेत? हे तेच लोक आहेत, ज्यांची नावे सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणात वारंवार आली आहेत. (लक्ष द्या, सर्वांकडे एकच वकील आहे.) ', असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

'सर्वच त्यांच्या मागे लागा. त्यांचे आयुष्य नरक बनवा, कारण त्यांनी मला खूपच त्रास दिला आहे. कायदा आणि न्याय यामुळे मी अपयशी ठरले असेल तरी, या महान राष्ट्रातील लोकांवर माझा पूर्ण विश्वास आहे. जय हिंद! आणि अलविदा...पुन्हा भेटू!...असं तनुश्रीने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fat Girls Fashion: बॉडीकॉन सारख्या ड्रेसमध्ये जाड दिसता? मग, तुमच्यासाठी हे ड्रेस टाईप आहेत परफेक्ट आणि अट्रॅक्टिव्ह

Maharashtra Politics : पुण्यानंतर आता ठाण्यातही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? राजकीय हालचाली वाढल्या

Maharashtra Live News Update : नाताळ आणि थर्टीफस्ट निमित्त मालवणमध्ये पर्यटक दाखल

कंठ दाटला, डोळ्यात पाणी; नाशिकच्या राड्यानंतर फरांदे स्पष्टच बोलल्या, थेट भाजपची चूक सांगितली

Pushkar Jog: 'माझं घर गेलं...'; मराठमोळ्या अभिनेत्याच्या मुंबईतील फ्लॅटला लागली भीषण आग, थोडक्यात वाचला जीव

SCROLL FOR NEXT