Mangala Bansode News Saam tv
मनोरंजन बातम्या

Mangala Bansode News: डिजेच्या तालवार होणाऱ्या शोमुळे अनेकांची तमाशाकडे पाठ; मंगला बनसोडे यांचा रोख कुणाकडे?

Mangala Bansode News: सध्या डिजेच्या तालवार होणाऱ्या शोमुळे अनेकांनी तमाशाकडे पाठ फिरवली, अशी खंत ज्येष्ठ तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांनी व्यक्त केली.

विजय पाटील

mangala Bansode News: 'महाराष्ट्राची लोककला खऱ्या अर्थाने जिवंत तमाशा कलावंतांनी ठेवली. अनेक अडचणींवर मात करत आजही लोककला अनेकांनी जोपासली आहे. कोरोना कालावधीनंतर उपासमारीची वेळ या कलावंतांवर आली. आता डिजेच्या तालवार होणाऱ्या शोमुळे अनेकांनी तमाशाकडे पाठ फिरवली, अशी खंत ज्येष्ठ तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांनी व्यक्त केली. (Latest Marathi News)

पहिल्या शाहिरी लोककला संमेलनात ज्येष्ठ तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांनी हजेरी लावली. या संमेलनात पोटासाठी नाचते, मी परवा कुणाची हे गाणे सादर करताच उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले. यावेळी संमेलनातील संपूर्ण वातावरण यावेळी भावनिक झाले होते.

डिजेच्या तालावार नृत्य करणाऱ्या नृत्यांगना यामुळे महाराष्ट्राची लोककला टिकवून ठेवलेल्या तमाशाला अद्यापही सुगीचे दिवस आले नाहीत. शासन दरबारी मदतीसाठी उंबरठे झिजवून सुद्धा काही घोषणाच झाली नसल्याचे दिसून येत आहे. यादरम्यान सांगली जिल्ह्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मगावी लोककलावंतांचे पाहिले शाहीर संमेलन आज संपन्न झाले.

या संमेलनात बनसोडे म्हणाल्या, सध्या आलेल्या डिजे गाण्यामुळे आणि त्यातून होणाऱ्या तरुणींच्या शोमुळे प्रेक्षकांनी लावणी आणि तमाशा या लोककलेकडे पाठ फिरवली आहे. सध्या यात्रा, जत्रामधून तमाशा जिवंत आहे. मायबाप प्रेक्षकाने तमाशा कलावंतांच्या पाठीशी उभे राहावे'.

तत्पूर्वी,राज्य शासनाने बंद केलेलं वार्षिक अनुदान सुरू करावे, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ सुरू करावे, अजित पवार आणि शरद पवार यांनी बनसोडे यांच्या आईच्या नावे महामंडळ सुरू करण्याचे आश्वासन दिले होते, ते त्यांनी पूर्ण करावे यांसह अन्य मागण्या या संमेलनाच्या माध्यमातून शासनाकडे करण्यात आल्या.

या संमेलानासाठी पुरोगामी संघटनेचे डॉ. भारत पाटणकर, शीतल साठे, सचिन माळी, बीआरएसचे नेते रघुनाथ पाटील उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actress Wedding : शुभमंगल सावधान! प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, विवाह सोहळ्यातील खास VIDEO आला समोर

Maharashtra News Live Update: नसरापूर प्रकरणाचा आज न्यायालयात निकाल

Ladki Bahin Yojana : आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय; बोगस लाडक्या बहिणींकडून पैशांची वसुली, सरकारचा जिल्हाधिकाऱ्यांना थेट आदेश

Thane Waterfall : पावसाळ्यात माथेरान, महाबळेश्वर विसरा; ठाण्यात लपलेला 'हा' धबधबा वीकेंड ट्रिपसाठी बेस्ट

Maharashtra politic : ६ खासदार फुटल्यानंतर ठाकरेंना आणखी धक्का, अंबादास दानवे महायुतीच्या गोटात, राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT