Tamannaah Bhatiya Dimond Ring Rumors Instagram
मनोरंजन बातम्या

Tamannaah Dimond Ring: तमन्नाला खरंच गिफ्टमध्ये मिळालेय जगातली पाचवी महागडी हिऱ्याची अंगठी, अभिनेत्रीनं स्वत:च केला खुलासा

Tamannaah Bhatia Ring: तमन्ना भाटियाने जगातील पाचव्या मोठ्या हिऱ्याबद्दल एक सत्य सांगितलंय. अभिनेत्रीचं हिऱ्या मागील सत्य ऐकून सर्वच चकीत झाले.

Chetan Bodke

Tamannaah Bhatia Dimond Ring Rumors

बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री तमन्ना भाटीया (Tamannaah Bhatiya) सध्या ‘लस्ट स्टोरी २’ मुळे चर्चेत आहे. तिच्या सोबत चित्रपटात विजय वर्मा देखील प्रमुख भूमिकेत आहे. अभिनेत्री नेहमीच सोशल मीडियावर खास अंदाजातील फोटो शेअर करत असते.

सोशल मीडियावर अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी एक अंगठीचा फोटो शेअर केला होता. अभिनेत्रीच्या त्या अंगठीमध्ये असलेला हिरा जगातील पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा असल्याची माहिती अनेक मीडिया रिपोर्ट्सने दिली आहे. अभिनेत्रीच्या त्या डायमंड रिंगने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

मीडिया रिपोर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार, तमन्नाकडे जगात पाचव्या क्रमांकावर असलेल्या सर्वात मोठ्या डायमंड मधील एक डायमंड तिच्या रिंगमध्ये आहे. अभिनेत्रीच्या त्या रिंग डायमंडची किंमत जवळपास २ कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे. तमन्नाच्या त्या अंगठीतील हिऱ्याचा आकार अतिशय सुंदर असून आकर्षक आहे.

अभिनेत्रीकडे असलेला हिरा राम चरणची पत्नी उपासना कामिनेनी कोनिडेलाने भेट म्हणून दिला आहे. अभिनेत्रीने अखेर व्हायरल फोटो मागील खरी माहिती सांगितली असून ती तितकीच गंमतीदार देखील आहे.

‘सई रा नरसिम्हा रेड्डी’ तील तमन्नाचा अभिनय उपासनाला आवडल्यामुळे तिने तिला तो हिरा गिफ्ट केला.

तमन्नाने त्या अंगठीचा फोटो तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केला असून त्याबद्दल तिने खुलासा देखील केला आहे. या हिऱ्याने सगळ्यांचाच गैरसमज झाला आहे. अभिनेत्रीच्या फोटोमधील तो हिरा खरा नसून तो एक बॉटल ऑपनर असल्याचं तिने सांगितले. सोबतच तिने इंस्टाग्राम स्टोरीवर हिऱ्याचा फोटो शेअर करताना, ‘आम्ही बॉटल ओपनरसह फोटोशूट करत होतो हा खरा हिरा नाहीये.’ मुलींना फोटो काढायला आवडतं असा हॅशटॅगही तिने दिला आहे.

तमन्नाच्या आगामी तमिळ चित्रपटातील कावला या गाण्यामुळे ती बरीच चर्चेत आली आहे. अभिनेत्रीकडे ‘जेलर’ सोबत तेलुगु ‘भोला शंकर’, मल्याळम ‘बांद्रा’ तर तमिळमधील ‘अरनमनाई ४’ सध्या तिचे इतके चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत आहेत. सोबतच तमन्ना भाटिया निखिल अडवाणी दिग्दर्शित ‘वेदा’ मध्ये जॉन अब्राहमसोबत प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT