Tamannaah Bhatia's Fan  Saam TV
मनोरंजन बातम्या

Tamannaah Bhatia Viral Video : सुरक्षारक्षकांना चकवा देत फॅन थेट तमन्ना भाटियाकडे धावला; अभिनेत्रीची प्रतिक्रिया पाहून नेटकरी...

Video of Tamannaah Bhatia's Crazy Fan : तमन्नाचा एक फॅन बॅरिकेडवरून उडी मारत तिच्याकडे येण्याचा प्रयत्न करतो.

Pooja Dange

Video Of Tamannaah Bhatia's Fan:

तमन्ना भाटियाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तमन्ना केरळमधील कार्यक्रमातून निघताना दिसत आहे. दरम्यान एका उत्साही चाहत्याने तिला शुभेच्छा देण्यासाठी तिच्यावर उडी मारण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमातील सुरक्षारक्षकांनी त्याला तातडीने मागे खेचले, तमन्नाने त्याला शांत करण्यापूर्वी, हात हलवण्याची ऑफर दिली आणि त्याच्यासोबत सेल्फी काढली.

सोशल मीडियावर सध्या चर्चेत असलेल्या व्हिडिओमध्ये तमन्ना केरळमधील एका कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसत आहे. तिने हिरवी साडी आणि गुलाबी ब्लाउज घातला आहे. तिच्या साडीच्या बॉर्डरवर हेवी भरतकाम आहे, तसेच भरपूर दागिने घातले आहेत. ती जात दोन्ही बाजूने चाहत्यांनी घेतर्ल आहे. तर तिच्या कडक सुरक्षे व्यवस्थेत बाहेर नेण्यात येत आहे.

दरम्यान तिचा एक फॅन बॅरिकेडवरून उडी मारत तिच्याकडे येण्याचा प्रयत्न करतो. फॅन तमन्नाला हात मिळविण्यासाठी धडपडत असतो. सुरक्षारक्षक फॅनला मागे खेचतात, तमन्ना फॅनच्या या कृत्याने शॉक होते.

त्यानंतर ती तिच्या गार्ड्सला समजावते आणि त्याला तिला भेदू देण्यास सांगते. तो तिच्यासमोर आल्यावर त्याला शांत करते आणि हात मिळवते. त्यानंतर ती अगदी शांतपणे चाहत्यासोबत सेल्फीसाठी पोझ देते, त्याला निरोप देण्यापूर्वी त्याला काहीतरी सांगते आणि पुढे जाते.

तमन्नाच्या या गोड वृत्तीला लाइव्ह प्रेक्षकांकडून केवळ टाळ्याच मिळाल्या नाहीत तर सोशल मीडियावर तिची खूप प्रशंसा देखील होत आहे. एका ट्विटर युजरने व्हिडिओवर कमेंट केली, "तिने ज्या प्रकारे परिस्थिती हाताळली ती खूप गोड आणि ग्राउंडेड व्यक्ती आहे." दुसऱ्याने लिहिले आहे, "तमन्ना नम्र आहे."

काही युजर्सनी या व्हिडीओच्या दुसऱ्या बाजूकडे नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यांनी लिहिले, “त्याने जे केले ते खूप लाजिरवाणे आणि अयोग्य आहे, जरी त्याच्या यावर युद्ध जिंल्याची रिऍक्शन दिली असली तरी.

अभिनेत्रीच्या दयाळूपणामुळे वाचला." दुसर्‍या युजरने लिहिले आहे, “सुरक्षारक्षकांनी परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे हाताळली पाहिजे. ती एक अभिनेत्री आहे आणि लोक त्यांचे चित्रपट पाहतात आणि त्यांना यश मिळवून देतात.... पण त्यामागे त्यांचे खूप समर्पण आहे.."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! ठाकरेंचा दिग्गज नेता आणि नगरसेवकाविरोधात गुन्हा, राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

SCROLL FOR NEXT