Surbhi Chandna  Instagram
मनोरंजन बातम्या

Surbhi Chandna Wedding: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, तारीखही आली समोर...

Taarak Mehta Ka Ulta Chashma Serial: सुरभी चंदना तिचा बॉयफ्रेंड करण शर्मासोबत लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. १३ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर सुरभी चंदना तिचा बिझनेसमन बॉयफ्रेंड करण शर्मासोबत लग्न करणार आहे.

Priya More

Actress Surbhi Chandna:

२०२३ हे वर्ष बॉलिवूडसह टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांसाठी खूपच खास ठरले. या वर्षात त्यांनी लग्न करत आयुष्याची सुरुवात केली. आता २०२४ या नव्या वर्षात देखील अनेक सेलिब्रिटी लग्न करण्याच्या तयारीमध्ये आहेत. बॉलिवूड अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान आज विवाहबंधनात अडकणार आहे. त्याचसोबत अभिनेत्री रकुल प्रित सिंग पुढच्या महिन्यामध्ये लग्न करणार असल्याचे सांगितले जात आहे. अशातच टीव्ही अभिनेत्री सुरभी चंदनाच्या लग्नाच्या (Surbhi Chandna Wedding) बातम्याही समोर येत आहेत. ज्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक दिसत आहेत.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ( taarak mehta ka ulta chashma) फेम अभिनेत्री सुरभी चंदना लवकरच लग्न करणार आहे. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सुरभी चंदना तिचा बॉयफ्रेंड करण शर्मासोबत लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. १३ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर सुरभी चंदना तिचा बिझनेसमन बॉयफ्रेंड करण शर्मासोबत लग्न करणार आहे. मार्चच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे कपल लग्न करत त्यांच्या नात्याला नवीन नाव देणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र त्यांच्या लग्नाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. घरच्यांचा सल्ला घेतल्यानंतर हे कपल त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर करू शकतात अशी माहिती समोर येत आहे.

सुरभी चंदना आणि करण शर्मा यांची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून एका पार्टीत झाली होती. एकमेकांना पाहताच दोघेही प्रेमात पडले. तेव्हापासून दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. या कपलने आतापर्यंत त्यांच्या नात्याबद्दल मौन बाळगले होते. सुरभी चंदनाने करण शर्माच्या वाढदिवसाला ९ सप्टेंबर २०२२ रोजी सोशल मीडियावर पोस्ट करून प्रेमाची कबुली दिली होती. आता लवकरच हे कपल लग्न करणार असल्यामुळे त्यांच्या चाहत्यांना आनंद झाला आहे.

दरम्यान, सुरभी चंदनाने २००९ मध्ये सब टीव्हीच्या लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधून तिच्या करिअरची सुरुवात केली. या शोनंतर सुरभी अनेक शोमध्ये छोट्या भूमिकांमध्ये दिसली. पण अभिनेत्रीचे नशीब 'इश्कबाज' मालिकेमुळे चमकले. या मालिकेमुळे ती घराघरामध्ये पोहचली. याशिवाय सुरभीने 'संजीवनी', 'नागिन 5', 'शेरदील शेरगिल' यासारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunil Shelke: महाराष्ट्रातील आमदारांच्या हत्त्येचा कट?आमदाराला संपवण्याचा डाव कुणाचा?

Wardha News : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली; मुलासह वडिलांचा करुण अंत, पुतण्याची मृत्यूशी झुंज

Modi Government: मोदी देणार विद्यार्थ्यांना 1 कोटी? आयडिया देणारा होणार मालामाल?

Mumbai Police : एसीबीची मोठी कारवाई; मुंबई पोलीस दलातील २ बड्या अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडलं

Chhagan Bhujbal: आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार, ओबीसींसाठी भुजबळांचा एल्गार

SCROLL FOR NEXT