TMKOC Jethalal Get Emotional For Daya Saam TV
मनोरंजन बातम्या

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Update : दयासाठी जेठालालच्या डोळ्यात पाणी... तारक मेहता...मध्ये लवकरच परतणार अभिनेत्री

Dayaben Returning To Show : तारक मेहता... मालिकेत दयाबेन येणार अशी चर्चा सुरू आहे.

Pooja Dange

TMKOC Jethalal Get Emotional For Daya : तारक मेहता का उल्टा चष्मा ही एक लोकप्रिय विनोदी मालिका आहे. गेली अनेक वर्ष ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. प्रेक्षक देखील या मालिकेवर तितकेच प्रेम करत आहेत. सध्या या मालिकेत दयाबेन येणार अशी चर्चा सुरू आहे.

गेल्या काही भागनमध्ये सुंदर (जेठालालचा मेहुणा) मुंबईला आला होता, असे मालिकेत दाखविण्यात येत होते. सुंदरच्या मुंबईतीलन एन्ट्रीने जेठालालसह गोकुळधाममधील सगळ्यांची झोप उडवली होती. (Latest Entertainment News)

सुंदरला भेटल्यापासून जेठालाल त्याला 'दया कधी येणार' हेच विचारत होता. पण सुंदर त्याच्या प्रश्नाचे उत्तर न देता विषय बदलायचा. अखेर सुंदरकडून दयाबेनची माहिती काढून घेण्यासाठी जेठालालने तारक मेहतांना कामाला लावले.

तारक मेहताने सुंदरला फोन केला आणि जेठालाल दुसरे लग्न करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर इमोशल झालेला सुंदर जेठालालची समजूत काढण्यासाठी घरी येतो. तेव्हा त्याला गोकुळधाममधील रहिवासी घेरतात आणि दयाबेन कधी परतणार असे विचारतात.

या सगळ्यांच्या प्रश्नांना उत्तर देत सुंदरने सांगितले की, 'मी तुम्हाला शपथ घेऊन सांगतो की बेहना या दिवाळीत तुमच्या दारात दिवा लावायला येणार.' तसेच तो पुढे म्हणतो की, 'कदाचित बेहना दिवाळीच्या आधी देखील येईल.'

हे ऐकून तिथे उपस्थित असलेले सगळेजण आनंदी होतात. जेठालालच्या डोळ्यातून आनंदाश्रू येतात. जेठालाल, तारक, टपू, बापूजी, भिडे, माधवी, पोपटलाल आणि अंजली सगळे मिळून दयाबेन येण्याच्या आनंदात गरबा खेळतात.

दयाबेन म्हणजे दिशा वकानी मालिकेत हे पात्र साकारत होती. गेल्या काही वर्षांपासून दिशा मालिकेपासून दूर आहे. त्याची अनेक करणे देखील आहेत. निर्माते देखील यावर अनेकदा बोलले आहेत.

तसेच दिशा वकानीची रिप्लेसमेंट देखील निर्माते शोधात होते. अखेर त्यांना दिशाच्या जागी दुसरी अभिनेत्री मिळाली असले म्हणून मालिकेत तिच्या येण्याची चर्चा सुरू आहे.

तर दुसरीकडे असे देखील असू शकते की, प्रेक्षक मालिकेत दयाबेन पाहण्यासाठी आतुर आहेत. तिच्या नसण्याने मालिकेच्या टीआरपीवर नक्की परिणाम झाला असेल आणि प्रेक्षकांना अजून किती दिवस वाट बघायला लावणार म्हणून निर्मात्यांनी दयाबेन येणार असल्याची हवा केली असणार.

जेठालाल आणि गोकुळधाममधील लोकांप्रमाणे आपण देखील वाट पाहूया, दयाबेन आता येणार की दिवाळीमध्ये ?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: आत्या आणि पुतण्यांच्या प्रेमाचा भयानक शेवट, झाडाला लटकलेले आढळले मृतदेह

India's Richest Person: अब्जाधिशांच्या यादीत 'किंग'ची एन्ट्री, शाहरूख खानची संपत्ती किती?

Gold Rate Today: सुवर्णनगरीत सोन्याने उच्चांक गाठला; दसऱ्याआधी १०५० रुपयांची वाढ; वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 29,327 हेक्टर क्षेत्रावर नुकसान

Hug Benefits : पार्टनरला जादूची झप्पी मारा अन् रिलॅक्स व्हा... वाचा फायदे

SCROLL FOR NEXT