Asit Modi Saam Tv
मनोरंजन बातम्या

Asit Modi Reacts: गुन्हा दाखल झाल्यानंतर ‘तारक मेहता का...’ निर्मात्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, ‘सध्या पोलीसांकडून...’

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Producer Asit Kumar Modi: मालिकेचे निर्माते असित मोदी यांच्यासह आणखी दोघांविरोधात काल गुन्हा दाखल झाला आहे.

Chetan Bodke

Mumbai News: ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिका सध्या कमालीची वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. मालिकेचे निर्माते असित मोदी आणि ऑपरेशन हेड सोहेल रमानी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांच्या विरोधात काल गुन्हा दाखल झाला आहे. मालिकेतील अभिनेत्रीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर शोचे निर्माते असित मोदी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

गुन्हा दाखल झाल्यानंतर ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे निर्माते असित कुमार मोदी म्हणतात, “एफआयआर नोंदवण्यात आली आहे की नाही याची आम्हाला माहिती नाही. सध्या पोलीसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, त्यामुळे ते यावर जास्त भाष्य करू शकत नसल्याचं सांगत याप्रकरणावर अधिक बोलणं टाळलं.”

मालिकेचे निर्माते असित मोदी, सोहेल रमाणी आणि जतीन बजाज छळ करत असल्याचा आरोप अभिनेत्रीने केला होता. याप्रकरणी पोलिसांनी भादंवि ३५४ आणि ५०९ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पवई पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. तारक मेहताच्या कोणत्या अभिनेत्रीने निर्मात्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Latest News Update)

शोमध्ये काम करणाऱ्या बऱ्याच कलाकारांनी शोचे निर्माते असित मोदी आणि दिग्दर्शकांवर गंभीर आरोप केले आहेत. तर एका अभिनेत्रीने लैंगिक छळाचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे.

मालिका गेल्या १५ वर्षांपासून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत असून मालिकेतील कलाकारांनी सोडचिठ्ठी दिली आहे. मालिकेला जरी सर्वाधिक टीआरपी असला तरी, कलाकारांनी मालिका सोडल्यामुळे प्रेक्षक नाराज आहेत. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : जिगरी यार गद्दार निघाला! रात्री बायकोसोबत बेडवर; रागात नवऱ्याने मित्राचा गळाच चिरला

पुण्याचा दुसरा मानाचा तांबडी जोगेश्वरी गणपती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित|VIDEO

Shreyas Iyer captain : श्रेयस अय्यर कर्णधार, बीसीसीआयचा मोठा निर्णय; संघाचीही घोषणा

Shocking : शरीर संबंधास दिला नकार, तरूणाने होणाऱ्या बायकोवर बलात्कार केला अन् जीव घेतला, पालघरमधील भयानक घटना

Krutika Deo: सुंदरा असावी कशी अप्सरा जशी...; कृतिका देवचा मनमोहक लूक पाहिलात का?

SCROLL FOR NEXT