Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Saam TV
मनोरंजन बातम्या

Jethalal On Break: 'तारक मेहता...'मध्ये १४ वर्षात हे पहिल्यांदाच घडलं! तुमच्या आवडत्या पात्राने मालिकेतून घेतला मालिकेतून ब्रेक

TMKOC Update: 'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतील जेठालाल गढा हे पात्र गेली १४ वर्षे काम करत आहे.

Pooja Dange

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Actor Dilip Joshi On Break:

गेल्या १४ वर्षांपासून 'तारक मेहता का उलट चष्मा' हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. हा कार्यक्रम रोज आपल्या भेटीला येतो. या कार्यक्रमातील कलाकारांना दररोज शूटिंग करावे लागते. त्यामुळे त्यांना स्वतःचा असा वेळ खूप कमी मिळतो.

'तारक मेहता का उलटा चष्मा' मालिकेतील जेठालाल गढा हे पात्र गेली १४ वर्षे काम करत आहे. हे एक असे पात्र आहे जे सुरुवातीपासून बदलले नाही. परंतु आता हे पात्र आपल्या भेटीला येणार नाही. अभिनेते दिलीप जोशी यांनी कार्यक्रमातून ब्रेक घेतला आहे.

'तारक मेहता का उलटा चष्मा'च्या कालच्या भागात दाखविण्यात आले की, गोकुळधाममध्ये सर्वजण गणेशोत्सव साजरा करत आहेत तर जेठालाल बॅग पॅककरून बाहेरगावी जाण्यासाठी निघाला आहे. दिलीप जोशी खऱ्या आयुष्यात देखील परदेशात गेले आहेत. इटाईम्सला अभिनेत्याच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप जोशी त्यांच्या कुटुंबियांसह टांझानिया येथे धार्मिक यात्रेसाठी गेले आहेत.

दिलीप जोशी स्वामी नारायण येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी दरेस्लाम येथे गेले आहेत. दिलीप जोशी यांच्या फॅन्सलाही माहीत आहे की ते सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. परंतु दिलीप जोशी यांनी अद्याप त्यांच्या यात्रेचा एकही फोटो पोस्ट केलेला नाही. मात्र दिलीप यांनी त्यांच्या शेवटच्या व्हिडीओमध्ये धार्मिक यात्रेविषयी सांगितले आहे. (Latest Entertainment News)

दिलीप जोशी यांनी या व्हिडीओमध्ये सांगितले आहे की, 'अबू धाबी येथे एक खूप मोठे हिंदू मंदिर बनणार आहे. त्यानिमित्त तेथे 'फेस्टिवल ऑफ हारमनी' साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी सर्वांनी आवश्य उपस्थित राहा' असे आवाहन करणारी पोस्ट दिलीप जोशी यांनी केली आहे.

जेठालाल कार्यक्रमात नसल्याची चर्चा बबितामुळे झाली. २८ तारखेला मुनमुन दत्ताचा वाढदिवस होता. मुनमुन दत्ताने सेटवरील वाढदिवसाचा व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये जेठालाल न दिसल्याने चर्चा सुरू झाली. अखेर जेठालाल म्हणजे दिलीप जोशी यांनी काही दिवसांसाठी कार्यक्रमातून ब्रेक घेतला असल्याचे समोर आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

आरोप करून पळ काढू नका; अजित पवारांबाबत निर्णायक भूमिका घ्या, नाहीतर माफी मागा, उद्धव ठाकरेंचा घणाघात|VIDEO

SCROLL FOR NEXT